Cue3

Thursday, January 2, 2020

ऑलिंपिक पात्रता क्रमवारीत वेटलिफ्टर मीराबाई आठवी

नवी दिल्ली : माजी जागतिक विजेती मीराबाई चानू ऑलिंपिक वेटलिफ्टिंग स्पर्धेच्या पात्रता क्रमवारीत आठव्या क्रमांकावर आहे. चानूचे 49 किलो गटाच्या क्रमवारीत 2966.6406 गुण आहेत.

ऑलिंपिक पात्रतेसाठी वेटलिफ्टरने नोव्हेंबर 2018 ते एप्रिल 2020 या कालावधीत सहा महिन्यांत किमान एक स्पर्धा खेळणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर या कालावधीत किमान एक सुवर्ण आणि एक रौप्य आवश्‍यक आहे. "वेटलिफ्टरच्या सहभागानुसार मानांकन गुण देण्यात आले आहेत. मीराबाई 2018 च्या जागतिक स्पर्धेत पाठदुखीमुळे खेळली नव्हती, तसेच काही स्पर्धांना मुकली होती,' याकडे राष्ट्रीय मार्गदर्शक विजय शर्मा यांनी लक्ष वेधले. त्याचवेळी त्यांनी एप्रिल अखेर सर्वोत्तम कामगिरी लक्षात घेऊनच क्रमवारी तयार होते, असे सांगितले.

चानू 2018 जागतिक स्पर्धा खेळली नाही, पण गतवर्षात तिची कामगिरी उंचावली. तिने एप्रिलमधील आशियाई स्पर्धेत एकूण 199 किलो वजन उचलले. सप्टेंबरमधील जागतिक स्पर्धेत तिने दोनशे किलो वजन उचलले होते. कतार स्पर्धेत तिने सुवर्णपदक जिंकले, पण तिला एकूण 194 किलो वजनच पेलता आले.

ऑलिंपिक पात्रता क्रमवारीत पहिल्या पाचमध्ये चीनच्या तिघी आहेत, पण त्यातील एकच ऑलिंपिकमध्ये खेळू शकेल. त्याचबरोबर पाचव्या ते सातव्या स्थानावर असलेल्या तिघींची सर्वोत्तम कामगिरी चानूपेक्षा (201) कमी आहे. दरम्यान, पुरुष क्रमवारीत युवा ऑलिंपिक विजेता जेरेमी लालरिन्नुंगा 32 व्या क्रमांकावर आहे.

News Item ID: 
599-news_story-1577985178
Mobile Device Headline: 
ऑलिंपिक पात्रता क्रमवारीत वेटलिफ्टर मीराबाई आठवी
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

नवी दिल्ली : माजी जागतिक विजेती मीराबाई चानू ऑलिंपिक वेटलिफ्टिंग स्पर्धेच्या पात्रता क्रमवारीत आठव्या क्रमांकावर आहे. चानूचे 49 किलो गटाच्या क्रमवारीत 2966.6406 गुण आहेत.

ऑलिंपिक पात्रतेसाठी वेटलिफ्टरने नोव्हेंबर 2018 ते एप्रिल 2020 या कालावधीत सहा महिन्यांत किमान एक स्पर्धा खेळणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर या कालावधीत किमान एक सुवर्ण आणि एक रौप्य आवश्‍यक आहे. "वेटलिफ्टरच्या सहभागानुसार मानांकन गुण देण्यात आले आहेत. मीराबाई 2018 च्या जागतिक स्पर्धेत पाठदुखीमुळे खेळली नव्हती, तसेच काही स्पर्धांना मुकली होती,' याकडे राष्ट्रीय मार्गदर्शक विजय शर्मा यांनी लक्ष वेधले. त्याचवेळी त्यांनी एप्रिल अखेर सर्वोत्तम कामगिरी लक्षात घेऊनच क्रमवारी तयार होते, असे सांगितले.

चानू 2018 जागतिक स्पर्धा खेळली नाही, पण गतवर्षात तिची कामगिरी उंचावली. तिने एप्रिलमधील आशियाई स्पर्धेत एकूण 199 किलो वजन उचलले. सप्टेंबरमधील जागतिक स्पर्धेत तिने दोनशे किलो वजन उचलले होते. कतार स्पर्धेत तिने सुवर्णपदक जिंकले, पण तिला एकूण 194 किलो वजनच पेलता आले.

ऑलिंपिक पात्रता क्रमवारीत पहिल्या पाचमध्ये चीनच्या तिघी आहेत, पण त्यातील एकच ऑलिंपिकमध्ये खेळू शकेल. त्याचबरोबर पाचव्या ते सातव्या स्थानावर असलेल्या तिघींची सर्वोत्तम कामगिरी चानूपेक्षा (201) कमी आहे. दरम्यान, पुरुष क्रमवारीत युवा ऑलिंपिक विजेता जेरेमी लालरिन्नुंगा 32 व्या क्रमांकावर आहे.

Vertical Image: 
English Headline: 
weightlifter Chanu eighth in Olympic qualification rankings
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
ऑलिंपिक, Olympics, वेटलिफ्टिंग, weightlifting, स्पर्धा, Day, विजय, victory, कतार
Twitter Publish: 
Meta Description: 
weightlifter Chanu eighth in Olympic qualification rankings माजी जागतिक विजेती मीराबाई चानू ऑलिंपिक वेटलिफ्टिंग स्पर्धेच्या पात्रता क्रमवारीत आठव्या क्रमांकावर आहे. चानूचे 49 किलो गटाच्या क्रमवारीत 2966.6406 गुण आहेत.
Send as Notification: 

from News Story Feeds https://ift.tt/2svx9Mt

No comments:

Post a Comment