Cue3

Thursday, January 2, 2020

कुस्ती महासंघाकडून सुशीलची पकड

नवी दिल्ली : सलग दोन ऑलिंपिक स्पर्धेत पदक जिंकलेला भारताचा एकमेव क्रीडापटू सुशील कुमारने निवड चाचणी काही तासांवर आलेली असताना आपण जखमी आहोत, असे सांगितले. त्याची चाचणी पुढे ढकलण्याची विनंती भारतीय कुस्ती महासंघाने फेटाळली आहे.

भारतीय कुस्ती महासंघाने उद्या विविध गटांसाठी निवड चाचणी घेतली आहे. त्यातील विजेता मानांकन स्पर्धा (15 ते 18 जानेवारी, रोम), आशियाई कुस्ती (18 ते 23 फेब्रुवारी, दिल्ली) आणि आशियाई ऑलिंपिक पात्रता (27 ते 29 मार्च, झियान-चीन) स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे.

हाताला झालेल्या दुखापतीमुळे चाचणीत खेळू शकणार नाही, पण ऑलिंपिक पात्रता स्पर्धेपर्यंत तंदुरुस्त होऊ शकेन, असे कळवताना सुशीलने वैद्यकीय प्रमाणपत्रही महासंघास पाठवले आहे. त्या वेळी त्याने चाचणी पुढे ढकलण्याची विनंती केली; मात्र महासंघाने त्यास नकार दिला. अर्थात, सुशीलला पूर्ण दुर्लक्षितही केले नाही.

आशियाई स्पर्धेनंतर आशियाई ऑलिंपिक पात्रता स्पर्धा होणार आहे. आशियाई स्पर्धेत चांगली कामगिरी न झाल्यास ऑलिंपिक पात्रता स्पर्धेसाठी चाचणी होऊ शकेल, असे भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण यांनी सांगितले. जागतिक स्पर्धेत पहिल्याच फेरीत हरल्याने सुशीलची ती संधी हुकली आहे. ऑलिंपिक पात्रतेची दुसरी तसेच अंतिम चाचणी 30 एप्रिल ते 3 मे दरम्यान सोफिया (बल्गेरिया) येथे आहे.

जागतिक स्पर्धेनंतर सराव करताना दुखापत झाली. त्याची भारतीय कुस्ती महासंघास जाणीव होती. त्यांना चाचणी घ्यायची असेल तर ते घेऊ शकतात. एक मात्र खरे, मी दोन आठवड्यांत पूर्ण तंदुरुस्त होऊ शकतो. कोणीही चिंता करू नका, मी नक्कीच पुनरागमन करणार, असे सुशीलने सांगितले.

दरम्यान, आतापर्यंत रवी दहिया (57 किलो), बजरंग (65 किलो) आणि दीपक पूनिया (86 किलो) तसेच विनेश फोगट (53 किलो) यांनीच जागतिक स्पर्धेद्वारे ऑलिंपिक पात्रता मिळवली आहे. बजरंगच्या गटात स्पर्धाच नाही, त्यामुळे त्याला चाचणीतून सूट देण्यात आली आहे; मात्र रवी, दीपक आणि विनेशला चाचणीत सहभागी होण्यास सांगितले आहे.

साक्षी, पूजा, विनेश चाचणीत खेळणार
विनेश फोगट (53 किलो), साक्षी मलिक (62 किलो) आणि पूजा धांदा (57 किलो) यांचाही चाचणीत सहभाग असेल. पूजा जागतिक स्पर्धेच्या चाचणीत 57 किलो गटात सरिता मोरविरुद्ध पराजित झाली होती, त्यामुळे तिने जागतिक स्पर्धेसाठी 59 किलो गटाची निवड केली होती, पण पुन्हा 57 किलो गटात आली आहे.

News Item ID: 
599-news_story-1577984810
Mobile Device Headline: 
कुस्ती महासंघाकडून सुशीलची पकड
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

Vertical Image: 
English Headline: 
sushil injured, wrestling federation continue with trials
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
ऑलिंपिक, Olympics, भारत, क्रीडा, Sports, कुस्ती, wrestling, स्पर्धा, Day, विनेश फोगट, Vinesh Phogat, साक्षी मलिक
Twitter Publish: 
Meta Description: 
sushil injured, wrestling federation continue with trials सलग दोन ऑलिंपिक स्पर्धेत पदक जिंकलेला भारताचा एकमेव क्रीडापटू सुशील कुमारने निवड चाचणी काही तासांवर आलेली असताना आपण जखमी आहोत, असे सांगितले. त्याची चाचणी पुढे ढकलण्याची विनंती भारतीय कुस्ती महासंघाने फेटाळली आहे.
Send as Notification: 

from News Story Feeds https://ift.tt/2Qn2Bpj

No comments:

Post a Comment