पुणे : सासू-सून म्हणजे "तू-तू-मै-मै' असे चित्र "घरोघरी मातीच्या चुली'प्रमाणे दिसते. धावण्याचा संदर्भ आल्यामुळे मात्र नांदेड सिटीतील एका कुटुंबात "धावून' येणाऱ्या सुनेला सहकार्य करणाऱ्या सासूबाईंचे उदाहरण निर्माण झाले आहे!
सुनेचे नाव आहे सारिका कारंडे, तर सासूबाई आहेत पुष्पाताई मेढे. जिममध्ये ट्रेडमीलवर वेगाने धावणाऱ्या सारिकाने ओंकार भागवत यांच्यामुळे धावायला सुरवात केली. केवळ मे महिन्यात धावायला लागल्यापासून सारिकाने दहा किमी अंतराच्या तीन शर्यती यशस्वीरित्या पूर्ण केल्या. त्यासाठी पहाटे पाच वाजता उठून साडेपाच वाजता घरातून बाहेर पडणारी सारिका धावून येते तोपर्यंत सव्वासात झालेले असतात. मधल्या वेळेत पुष्पाताई चार वर्षांचा नातू हिृदान याला उठविणे, अंघोळ घालणे, इथपासून फ्रिजमधील भाजी काढून निवडणे, स्वयंपाकाची तयारी करणे अशी कामे करतात. सारिका आल्यावर मुलाला स्कूलबसला सोडते आणि मग पुष्पाताई फिरायला बाहेर पडतात.
हे करताना सासू-सुनेची कुठेही धावपळ होत नाही आणि सारिका धावण्याचा, तर पुष्पाताई चालण्याचा सराव मजेत करतात. मुळात सारिका या पुष्पाताईंना काकूच म्हणतात. धावण्याचे जग काय असते याची ओळख व्हावी म्हणून सारिका त्यांना पिंकेथॉन शर्यतीला घेऊन गेली. विशेष म्हणजे तेव्हा पुष्पाताईंनी तीन किमी शर्यतीला नाव नोंदविले. त्यांनी भरभर चालत शर्यत पूर्ण केली. त्याबद्दल त्यांना मेडलही मिळाले. सुनेपेक्षा आपले फोटो जास्त टिपले गेले यामुळे नव्हे तर एकूणच धावण्याचे जग पाहून त्या भारावून गेल्या. रोज एक-दीड किमी चालणाऱ्या पुष्पाताई यांच्यासाठी दुप्पट अंतराची शर्यत पूर्ण करणे सुखद धक्का ठरला.

from News Story Feeds https://ift.tt/2QHbasC
No comments:
Post a Comment