Cue3

Friday, November 16, 2018

प्रो कबड्डी : अधिक सामने जिंकण्यासाठी प्रयत्नशील : रोहितकुमार

मुंबई : यंदाच्या प्रो कबड्डीच्या सहाव्या मोसमात आमचा खेळ सामन्यागणिक बहरत आहे. आतापर्यंत झालेल्या आठ सामन्यांत आम्ही सहा विजय मिळविले आहेत. लीगमधील भविष्यातील वाटचालीसाठी हा प्रवास निश्‍चित आशादायी आहे. यापुढे होणाऱ्या प्रत्येक सामन्यात खेळ उंचावून अधिक सामने जिंकण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असू, अशी प्रतिक्रिया बंगळूर बुल्सचा कर्णधार रोहितकुमारने व्यक्त केली. 

दिल्लीजवळील निजामपूर भागात राहणाऱ्या रोहितकुमारने अभ्यासात हुशार नसल्यामुळे नोकरी मिळविण्यासाठी कबड्डी खेळायला सुरवात केली. कबड्डीमुळेच आपल्या गावातील खेळाडूंना रेल्वे, पोलिस आणि सैन्यात नोकरी मिळाली असल्यामुळे त्याने कबड्डीचा रस्ता पकडला. यात त्याला यश आले आणि नौदलात जाण्याची संधी मिळाली. अर्थात, कबड्डीची निवड करण्यात वडिलांचा मोठा हात असल्याचे सांगून रोहित म्हणाला, "सुरवातीला डोक्‍यात अनेक खेळांचा विचार होता. कुठला खेळ खेळावा यावर एकमत होत नव्हते, तेव्हा वडिलांनी कबड्डीत जाण्याचा सल्ला दिला. कबड्डीत इथपर्यंत पोचण्यात मला वडिलांकडून मिळालेल्या प्रोत्साहनाचा मोठा वाटा आहे.'' 

प्रो कबड्डीमुळे या खेळाची "क्रेझ' वाढत असल्याचे सांगून रोहित म्हणाला, "कबड्डी देशात लोकप्रिय खेळ होताच; पण प्रो कबड्डीमुळे तो घराघरांत पोचला आणि पालक आपल्या मुलांना कबड्डी खेळण्यासाठी प्रोत्साहन देऊ लागले. हा सर्वांत मोठा फरक "प्रो' लीगमुळे पडला आहे. त्याचबरोबर कबड्डी खेळाडूंना आता मैदानाबाहेरदेखील नावाने ओळखले जाऊ लागले आहे. खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यातही मोठा फरक पडला आहे.'' कबड्डीवर जर एखादा सिनेमा निघाला, तर तो आपल्या कारकिर्दीवर निघावा इतका चांगला खेळ मला करायचा असल्याचेही रोहितने शेवटी सांगितले. 

News Item ID: 
51-news_story-1542348590
Mobile Device Headline: 
प्रो कबड्डी : अधिक सामने जिंकण्यासाठी प्रयत्नशील : रोहितकुमार
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

मुंबई : यंदाच्या प्रो कबड्डीच्या सहाव्या मोसमात आमचा खेळ सामन्यागणिक बहरत आहे. आतापर्यंत झालेल्या आठ सामन्यांत आम्ही सहा विजय मिळविले आहेत. लीगमधील भविष्यातील वाटचालीसाठी हा प्रवास निश्‍चित आशादायी आहे. यापुढे होणाऱ्या प्रत्येक सामन्यात खेळ उंचावून अधिक सामने जिंकण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असू, अशी प्रतिक्रिया बंगळूर बुल्सचा कर्णधार रोहितकुमारने व्यक्त केली. 

दिल्लीजवळील निजामपूर भागात राहणाऱ्या रोहितकुमारने अभ्यासात हुशार नसल्यामुळे नोकरी मिळविण्यासाठी कबड्डी खेळायला सुरवात केली. कबड्डीमुळेच आपल्या गावातील खेळाडूंना रेल्वे, पोलिस आणि सैन्यात नोकरी मिळाली असल्यामुळे त्याने कबड्डीचा रस्ता पकडला. यात त्याला यश आले आणि नौदलात जाण्याची संधी मिळाली. अर्थात, कबड्डीची निवड करण्यात वडिलांचा मोठा हात असल्याचे सांगून रोहित म्हणाला, "सुरवातीला डोक्‍यात अनेक खेळांचा विचार होता. कुठला खेळ खेळावा यावर एकमत होत नव्हते, तेव्हा वडिलांनी कबड्डीत जाण्याचा सल्ला दिला. कबड्डीत इथपर्यंत पोचण्यात मला वडिलांकडून मिळालेल्या प्रोत्साहनाचा मोठा वाटा आहे.'' 

प्रो कबड्डीमुळे या खेळाची "क्रेझ' वाढत असल्याचे सांगून रोहित म्हणाला, "कबड्डी देशात लोकप्रिय खेळ होताच; पण प्रो कबड्डीमुळे तो घराघरांत पोचला आणि पालक आपल्या मुलांना कबड्डी खेळण्यासाठी प्रोत्साहन देऊ लागले. हा सर्वांत मोठा फरक "प्रो' लीगमुळे पडला आहे. त्याचबरोबर कबड्डी खेळाडूंना आता मैदानाबाहेरदेखील नावाने ओळखले जाऊ लागले आहे. खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यातही मोठा फरक पडला आहे.'' कबड्डीवर जर एखादा सिनेमा निघाला, तर तो आपल्या कारकिर्दीवर निघावा इतका चांगला खेळ मला करायचा असल्याचेही रोहितने शेवटी सांगितले. 

Vertical Image: 
English Headline: 
pro kabaddi league bangalore bulls rohit kumar interview
सकाळ वृत्तसेवा
Author Type: 
Agency
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Pro kabbadi league, Kabaddi, Rohit Kumar
Meta Description: 
pro kabaddi league bangalore bulls rohit kumar interview

from News Story Feeds https://ift.tt/2PvjxLw

No comments:

Post a Comment