पिंपरी - इजिप्त येथे नुकत्याच झालेल्या यूआयपीएम बायथल आणि ट्रायथल २०१८ वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये मुग्धा वाव्हळ (वय १३) या विद्यार्थिनीच्या गटाने ब्राँझ मेडल पटकावले. मुग्धा ही निगडीतील सिटी प्राइड स्कूलमध्ये आठवीत शिकत आहे.
या स्पर्धेमध्ये सुमारे सत्तावीस देश सहभागी झाले होते. चारशे मीटर धावणे, पंचवीस मीटर पोहणे याच्या चार फेऱ्या आणि नेमबाजीच्या पाच फेऱ्यांचा समावेश असतो म्हणजे एकूण सोळाशे मीटर धावणे, शंभर मीटर पोहणे आणि नेमबाजीचे पाच शॉट्स शिवाय चार वेळा लेझर शूटिंग असे स्पर्धेचे स्वरूप असते. ट्रायथल ब्रॉन्झ मेडल विजेत्या पंधरा वर्षांखालील मुलींच्या गटात अनन्या नामदे (पुणे) आणि सायली गांजळे (मंचर) यांचाही समावेश होता. यात भारतीय संघात नऊ ते एकोणीस वयोगटातील बावीस खेळाडूंचा सहभाग होता.
बालेवाडी येथे झालेल्या नवव्या मॉडर्न पेंटॅथलॉन राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेतील कामगिरीनुसार भारतीय खेळाडूंची निवड करण्यात आली होती. याबाबत मुग्धाचे वडील महेश वाव्हळ म्हणाले, ‘‘वयाच्या पाचव्या वर्षापासून मुग्धाची खेळातील आवड आणि नैपुण्य लक्षात आल्याने आम्ही तिला विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्यास प्रोत्साहित केले. स्थानिक, जिल्हा आणि राज्य पातळीवरील विविध स्पर्धांमध्ये तिने पारितोषिके मिळवली.’’

from News Story Feeds https://ift.tt/2Pz3M6f
No comments:
Post a Comment