नवी दिल्ली - मूळ लाल मातीपासून मॅटपर्यंत मजल मारलेल्या कुस्तीने आता स्थित्यंतराच्या प्रक्रियेत नवे पाऊल टाकले आहे. देशातील प्रमुख कुस्तीपटूंना कराराचा लाभ मिळेल. भारतीय कुस्ती महासंघाने (डब्ल्यूएफआय) या महत्त्वाकांक्षी योजनेची प्राथमिक तयारी केली असून, लवकरच यास मूर्त स्वरूप दिले जाईल. ‘बीसीसीआय’ने क्रिकेटपटूंना मालामाल केल्यानंतर क्रीडापटूंना असा करार देणारा ‘डब्ल्यूएफआय’ हा देशातील दुसराच क्रीडा महासंघ ठरेल.
मंगळवारी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीस दोन वेळचा ऑलिंपियन पदक विजेता मल्ल सुशील कुमार, लंडन ऑलिंपिक ब्राँझ विजेता योगेश्वर दत्त, यंदा जागतिक स्पर्धेत रौप्य मिळविलेला बजरंग पुनिया यांच्यासह पुडा धांडा, विनेश फोगट आणि दिव्या काकरान हे प्रमुख खेळाडूही बैठकीस उपस्थित होते. सुरवातीला ज्युनियर मल्लांचा समावेश नव्हता; पण ‘डब्ल्यूएफआय’चे प्रमुख ब्रीजभूषण शरण यांच्या आग्रहामुळे त्यांचा समावेश झाला. कॅडेट गटातील मल्लांना दरमहा पाच हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळू शकेल. ज्युनियर व २३ वर्षांखालील गटासाठी पाच हजार ते दहा हजार असा आकडा असेल.
राष्ट्रीय स्पर्धेला महत्त्व
या योजनेत राष्ट्रीय स्पर्धेचे महत्त्व वाढेल. त्यातील विजेते योजनेस थेट पात्र ठरतील. त्यामुळे राष्ट्रीय स्पर्धा त्यांना गांभीर्याने घ्यावी लागेल. आंतरराष्ट्रीय पदक मिळविल्यास मल्लांना वरील श्रेणीत बढती मिळेल. याचधर्तीवर कॅडेट-ज्युनियर मल्ल आशियाई किंवा महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील पदकांमुळे दोन श्रेणी वर जातील.
दिव्याकडून स्वागत दिव्याने पायाभूत पातळीवर मदत मिळत नसल्याबद्दल अलीकडेच तीव्र टीका केली होती. तिने या योजनेचे स्वागत केले. ती म्हणाली, ‘‘मल्लांची नावे जाहीर झाल्यानंतर सर्व चित्र स्पष्ट होईल. सर्व मल्लांना आणि खासकरून ज्यांनी आत्ताच कुस्ती सुरू केली आहे त्यांना आनंद झाला आहे. अनेकांना किट आणि ‘सप्लीमेंट्स’चे पैसे मोजण्यासाठी झगडावे लागते. त्यामुळे अनेकजण कुस्ती सोडून देतात. अशावेळी ही योजना चांगली ठरेल.’’
दृष्टिक्षेपात
दीडशे मल्लांची निवड अपेक्षित
कराराच्या ‘ए’ ते ‘आय’ अशा नऊ श्रेणी
‘ए’ श्रेणीतील मल्लांना वर्षाला ३० लाख रुपये
‘आय’ श्रेणीतील मल्लांसाठी हा आकडा ३६ हजार
राष्ट्रीय स्पर्धांतील कामगिरी करार पद्धतीचा निकष
सध्या ‘बीसीसीआय’कडून ४५ खेळाडू करारबद्ध, ज्यात २६ पुरुष व १९ महिला

from News Story Feeds https://ift.tt/2PDN5py
No comments:
Post a Comment