Cue3

Thursday, November 22, 2018

रणजी करंडक : विदर्भाने उभारला धावांचा डोंगर

नागपूर : यंदाच्या रणजी मोसमात गतविजेत्या विदर्भाला अपेक्षित सुरवात करता आली नव्हती. पहिले दोन्ही सामने बाहेर खेळल्यानंतर घरच्या मैदानावर खेळताना विदर्भ संघाने उचल घेतली आणि बडोद्याविरुद्ध धावांचा डोंगर उभा करून दुसऱ्या दिवशीच आपली बाजू भक्कम केली. दुसऱ्या दिवशी खेळ थांबला तेव्हा विदर्भाने पहिल्या डावात 6 बाद 259 धावा केल्या होत्या. 

दोन दिवसांच्या खेळात कर्णधार फैज फजल, वसिम जाफर यांची दीडशतकी खेळी, अक्षय वाडकरने झळकाविलेले शतक हेच दुसऱ्या दिवसाचे वैशिष्ट्य ठरले. त्याचवेळी देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत रणजीमध्ये अकरा हजार धावांचा टप्पा ओलांडून वसिम जाफरने नवा विक्रम केला. अशी कामगिरी करणारा तो पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. 

पहिल्या दिवशीच्या 1 बाद 268 या धावसंख्येवरून डावाला सुरवात केली तेव्हा, जाफर आणि फैजच्या द्विशतकाची उत्सुकता होती. दुर्दैवाने दोघेही उपहारापूर्वीच बाद झाले. बाद होण्यापूर्वी त्यांनी दुसऱ्या गड्यासाठी 300 धावांची भागीदारी रचली. मुंबईकर 40 वर्षीय जाफरने 13 चौकार व दोन षटकारांसह 284 चेंडूंत 153 धावा फटकावल्या. तर, कर्णधार फैजने 356 चेंडूंच्या मॅरेथॉन खेळीत 15 चौकार व दोन षटकारांच्या मदतीने 151 धावा काढल्या. 

ही जोडी फुटल्यावर बढती मिळालेल्या यष्टिरक्षक अक्षय वाडकरने चाचपडत सुरवात केल्यानंतर मोसमातील दुसऱ्या शतकाची नोंद केले. त्याने 156 चेंडूंचा सामना करताना 15 चौकारांसह आपली नाबाद 102 धावा केल्या. वाडकरच्या शतकानंतर विदर्भाने 6 बाद 529 धावांवर डाव घोषित केला. त्यानंतर उर्वरित खेळात बडोद्याने बिनबाद 41 धावा केल्या. 

संक्षिप्त धावफलक ः
विदर्भ पहिला डाव : 164 षटकांत 6 बाद 529 डाव घोषित
(वसीम जाफर 153, फैज फजल 151, अक्षय वाडकर नाबाद 102, गणेश सतीश 56, अपूर्व वानखेडे 29, रवी जांगीड 11, भार्गव भट्‌ट 2-111, लुकमन मेरिवाला 2-79, सोएब तई 1-108). बडोदा पहिला डाव : 14 षटकांत बिनबाद 41 (केदार देवधर खेळत आहे 20, आदित्य वाघमोडे खेळत आहे 20)

News Item ID: 
51-news_story-1542810469
Mobile Device Headline: 
रणजी करंडक : विदर्भाने उभारला धावांचा डोंगर
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

Vertical Image: 
English Headline: 
Vidarbha batsmen scores big agains Baroda in Ranji trophy
सकाळ वृत्तसेवा
Author Type: 
Agency
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Ranji trophy, Vidarbha, Wasim Jaffer
Meta Description: 
Vidarbha batsmen scores big agains Baroda in Ranji trophy

from News Story Feeds https://ift.tt/2DAj03C

No comments:

Post a Comment