नॉर्थ साऊंड (अँटिगा) : भारतीय महिला संघ एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याच्या उद्देशानेच शुक्रवारी सकाळी टी- 20 विश्वकरंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध मैदानात उतरतील.
भारतीय महिला संघाला त्या वेळी इंग्लंड संघाकडून चुरशीच्या लढतीत 9 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. एकदिवसीय क्रिकेटप्रमाणेच टी- 20 विश्वकरंडक स्पर्धेतही भारतीय महिलांची आगेकूच विलक्षण राहिली आहे. गटातील सर्व सामने जिंकताना त्यांनी आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले.
मिताली राज आणि हरमनप्रीत कौर या दोघींची कामगिरी भारतीय संघाचे खरे बलस्थान राहिले आहे. मर्यादित षटकांच्या सामन्यात इंग्लंडसारख्या गुणवान संघावर विजय मिळविण्यासाठी मिताली आणि हरपमनप्रीत यांच्याकडून कामगिरीत सातत्य अपेक्षित आहे. स्मृती मानधना आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांची त्यांना साथ मिळेल.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत मितालीला विश्रांती दिल्यानंतरही भारताने विजय मिळविला ही सर्वात मोठी गोष्ट आहे. आता मिताली या महत्त्वाच्या सामन्यासाठी संघात परतणार आहे. त्यामुळे भारतीय संघाची ताकद नक्कीच वाढलेली असेल. एकच वेगवान गोलंदाज घेऊन खेळण्याचे प्रशिक्षक रमेश पोवार यांचे नियोजन चांगलेच यशस्वी ठरले आहे. भारतीय फिरकी गोलंदाजांनी त्यांच्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविला आहे. पूनम यादवने 8, तर राधा यादव हिने 7 गडी बाद केले आहेत. दिप्ती शर्मा आणि हेमलता या ऑफ स्पिन गोलंदाजही फॉर्मात आहेत. चार सामन्यांत भारताच्या अरुंधती रेड्डी आणि मानसी जोशी या मध्यमगती गोलंदाजांनी मिळून केवळ 13 षटके टाकली आहेत. यावरून भारतीय फिरकीची ताकद लक्षात येऊ शकते.
इंग्लंड संघाचे नियोजन बरोबर विरुद्ध आहे. त्यांच्या वेगवान गोलंदाज यशस्वी ठरल्या आहेत. त्याचबरोबर फलंदाजीतील ऍमी जोन्स हिचे सातत्य इंग्लंडसाठी महत्त्वाचे ठरेल. तिने तीन अर्धशतके झळकाविली आहेत. या वेळी तिला भारतीय फिरकीचे आव्हान परतवावे लागेल.

from News Story Feeds https://ift.tt/2zjWhWI
No comments:
Post a Comment