Cue3

Wednesday, November 28, 2018

वाघोली जैन शाळेचा तुफान प्रतिसाद

पुणे - पुणे हेल्थ डेनिमित्ताने हाफ मॅरेथॉन होत असल्याचे भारतीय जैन संघटनेच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना समजले आणि त्यांनी नावनोंदणी करण्यासाठी शाळेच्या कार्यालयात एकच गर्दी केली. ‘या स्पर्धेत केवळ मोठ्या संख्येने भागच घ्यायचा नाही तर ती जिंकायचीच’, असा निर्धारही त्यांनी केला.

किल्लारी परिसरात झालेल्या भूकंपातून वाचलेल्या एक हजार मुलांना घेऊन भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतिलाल मुथ्था पुण्यात आले आणि त्यांनी त्या मुलांसाठी शाळा सुरू केली. या मुलांबरोबरच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची तसेच मेळघाट, नंदुरबार अशा भागांतील आदिवासी तसेच आजूबाजूला राहणाऱ्या रहिवाशांची मुलेही या शाळेत आली. या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या सुमारे तीन हजार एवढी आहे. शाळेचा निकाल शंभर टक्‍क्‍यांच्या आसपास लागतोच, पण ती मुले खेळातही चमकू लागली. आताही हाफ मॅरेथॉनची घोषणा होताच ती सज्ज झाली. तीन हजार विद्यार्थ्यांपैकी अधिकाधिक जण मुख्य शर्यतीत भाग घेतील, असा विश्‍वास संस्थाचालक व्यक्त करीत आहेत.

भूकंपग्रस्तांच्या तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शाळा सुरू करण्यामागे सामाजिक ऋण फेडण्याचा उद्देश होता. या मुलांचा तसेच आदिवासी मुलांचा सर्वांगीण विकास करण्याचे आमचे ध्येय आहे. त्यामुळेच त्यांना क्रीडा क्षेत्रातही संधी आम्ही देत आहोत. त्याचाच एक भाग म्हणून बजाज अलियांझ मॅरेथॉन स्पर्धेत आमच्या शाळेतील मुले मोठ्या संख्येने भाग घेणार आहेत.
- शांतिलाल मुथ्था, संस्थापक, भारतीय जैन संघटना
 
मुलांना या वयापासून व्यायामाची आवड लागली तर त्यांना त्याचा फायदा मिळतो, त्यांच्या अभ्यासावर सकारात्मक परिणाम होतो. प्रत्येक मुलाला दर आठवड्याला दोन तास प्रशिक्षित मार्गदर्शकाकडून मार्गदर्शन मिळते. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवरही विद्यार्थी चमकतात. त्यांनी खेळामध्येही चमक दाखविली आहे. कबड्डी, खो-खो, व्हॉलिबॉल, जिन्मॅस्टिक्‍स, अडथळ्याची शर्यत, ॲथलेटिक्‍स या खेळांमध्ये त्यांनी पारितोषिके मिळविली आहेत आणि या अर्ध मॅरेथॉनमध्येही विजयी होण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे.
- संतोष भंडारी, प्राचार्य, भारतीय जैन संघटनेचे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय

News Item ID: 
51-news_story-1543381543
Mobile Device Headline: 
वाघोली जैन शाळेचा तुफान प्रतिसाद
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

Vertical Image: 
English Headline: 
Wagholi Jain school good response to pune half marathon
सकाळ वृत्तसेवा
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
पुणे हाफ मॅरेथॉन, क्रीडा, पुणे
Twitter Publish: 

from News Story Feeds https://ift.tt/2Qnj5OL

No comments:

Post a Comment