Cue3

Wednesday, November 28, 2018

दहा हजार मीटरमध्ये आरती पाटीलला सुवर्ण

नागपूर - मंगळूर येथे सुरू असलेल्या ७९ व्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ ॲथलेटिक्‍स स्पर्धेत नाशिकच्या असलेल्या आणि स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आरती पाटीलने महिलांच्या १० हजार मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकून दुहेरी यश संपादन केले. पहिल्या दिवशी तिने पाच हजार मीटर शर्यतीतही सुवर्णपदक जिंकले होते. 

तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राजक्ता गोडबोलेला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. पहिल्या दिवशी पाच हजार मीटर शर्यतीत तिला ब्राँझपदक मिळाले होते. 

मंगळवारी सकाळी झालेल्या महिलांच्या १० हजार मीटर शर्यतीत सुवर्णपदकासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची आरती पाटील, गोरखपूरची फुलन पाल आणि प्राजक्ता यांच्यात चुरस होती; मात्र शेवटचे ६० मीटर अंतर शिल्लक असताना प्राजक्ता माघारली आणि नाशिककर आरतीने ३५ मिनिटे ३८.०८ सेकंदात सुवर्णपदक जिंकले. 

News Item ID: 
51-news_story-1543382636
Mobile Device Headline: 
दहा हजार मीटरमध्ये आरती पाटीलला सुवर्ण
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

नागपूर - मंगळूर येथे सुरू असलेल्या ७९ व्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ ॲथलेटिक्‍स स्पर्धेत नाशिकच्या असलेल्या आणि स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आरती पाटीलने महिलांच्या १० हजार मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकून दुहेरी यश संपादन केले. पहिल्या दिवशी तिने पाच हजार मीटर शर्यतीतही सुवर्णपदक जिंकले होते. 

तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राजक्ता गोडबोलेला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. पहिल्या दिवशी पाच हजार मीटर शर्यतीत तिला ब्राँझपदक मिळाले होते. 

मंगळवारी सकाळी झालेल्या महिलांच्या १० हजार मीटर शर्यतीत सुवर्णपदकासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची आरती पाटील, गोरखपूरची फुलन पाल आणि प्राजक्ता यांच्यात चुरस होती; मात्र शेवटचे ६० मीटर अंतर शिल्लक असताना प्राजक्ता माघारली आणि नाशिककर आरतीने ३५ मिनिटे ३८.०८ सेकंदात सुवर्णपदक जिंकले. 

Vertical Image: 
English Headline: 
Aarti Patil has gold in ten thousand meters
सकाळ वृत्तसेवा
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
नागपूर, Nagpur, पुणे
Twitter Publish: 

from News Story Feeds https://ift.tt/2DOMlr5

No comments:

Post a Comment