Cue3

Wednesday, October 24, 2018

सुवर्ण बघता बघता दूर गेले - बजरंग

बुदापेस्ट - जागतिक कुस्तीतील सुवर्णपदक इतक्‍या जवळ आले; पण बघता बघता दूर गेले, अशी खंत बजरंग पुनियाने व्यक्त केली. काल झालेल्या अंतिम सामन्यात जपानच्या ताकूतो ओटोगुरोकडून बजरंग पराभूत झाला असला, तरी याअगोदरच्या कामगिरीत त्याने सुधारणा केली. आता त्याच्याकडे जागतिक कुस्तीची ब्राँझ आणि रौप्य अशी दोन पदके आहेत. भारताचा हुकमी कुस्तीपटू म्हणून बजरंगकडून मोठ्या अपेक्षा आहेत. अंतिम फेरी गाठून त्याने आपली क्षमता दाखवून दिली होती; परंतु अंतिम सामन्यात तो निष्प्रभ ठरला. मलाही सुवर्णपदकाची अपेक्षा होती; परंतु रौप्यपदकावर समाधान मानावे लागले; पण हेही नसे थोडके, या रौप्यपदकाचेही समाधान आहे, असे मत बजरंगने व्यक्त केले.  हे रौप्यपदक आपण अमृतसर रेल्वे दुर्घटनेत मृत झालेल्यांना अर्पण करत असल्याचे ट्‌विट बजरंगने केले. मृत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी आहोत, असेही त्याने म्हटले आहे.

News Item ID: 
51-news_story-1540355688
Mobile Device Headline: 
सुवर्ण बघता बघता दूर गेले - बजरंग
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

बुदापेस्ट - जागतिक कुस्तीतील सुवर्णपदक इतक्‍या जवळ आले; पण बघता बघता दूर गेले, अशी खंत बजरंग पुनियाने व्यक्त केली. काल झालेल्या अंतिम सामन्यात जपानच्या ताकूतो ओटोगुरोकडून बजरंग पराभूत झाला असला, तरी याअगोदरच्या कामगिरीत त्याने सुधारणा केली. आता त्याच्याकडे जागतिक कुस्तीची ब्राँझ आणि रौप्य अशी दोन पदके आहेत. भारताचा हुकमी कुस्तीपटू म्हणून बजरंगकडून मोठ्या अपेक्षा आहेत. अंतिम फेरी गाठून त्याने आपली क्षमता दाखवून दिली होती; परंतु अंतिम सामन्यात तो निष्प्रभ ठरला. मलाही सुवर्णपदकाची अपेक्षा होती; परंतु रौप्यपदकावर समाधान मानावे लागले; पण हेही नसे थोडके, या रौप्यपदकाचेही समाधान आहे, असे मत बजरंगने व्यक्त केले.  हे रौप्यपदक आपण अमृतसर रेल्वे दुर्घटनेत मृत झालेल्यांना अर्पण करत असल्याचे ट्‌विट बजरंगने केले. मृत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी आहोत, असेही त्याने म्हटले आहे.

Vertical Image: 
English Headline: 
Bajrang Punia Global Wrestling Competition
सकाळ वृत्तसेवा
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
भारत, अमृतसर, रेल्वे
Twitter Publish: 

from News Story Feeds https://ift.tt/2D2obcW

No comments:

Post a Comment