पॅरिस - डेन्मार्क स्पर्धेत पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसलेल्या पी. व्ही. सिंधूने फ्रेंच बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी देताना कडवी प्रतिस्पर्धी बेवेन झॅंगचा २१-१७, २१-८ असा सहज पराभव केला. सिंधूने ३४ मिनिटांत हा विजय मिळवला. झॅंग ही सिंधूसाठी धोकादायक ठरलेली आहे. दोघींनी आतापर्यंत एकमेकींविरुद्ध दोन-दोन विजय मिळवलेले आहेत. हे सर्व सामने तीन गेमपर्यंत रंगलेले आहेत. या पार्श्वभूमीवर सिंधूने दोन गेममध्ये मिळवलेला विजय सुखावणारा आहे. पहिला गेम चुरशीचा झाला. सुरवातीला सिंधू दोन गुणांनी पाठीमागे होती; परंतु लय सापडल्यावर तिने खेळावर नियंत्रण मिळवले. सलग सात गुण मिळवण्याची तिने कामगिरी केली. दुसऱ्या गेममध्ये मात्र सिंधूला संघर्ष करावा लागला नाही. सर्व्हिसमधील सफाई आणि अचूक स्मॅश तिच्या खेळाचे वैशिष्ट्य ठरले.

from News Story Feeds https://ift.tt/2PO8vNu
No comments:
Post a Comment