नवी दिल्ली - आशियाई पदकविजेत्या खेळाडूंची बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली. त्या वेळी पदकविजेत्यांचे कौतुक करताना पंतप्रधानांनी, ‘आशियात चमकलात, आता ऑलिंपिक यशासाठी अधिक मेहनत घ्या’ असा सल्ला दिला.
पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या या सोहळ्यात खेळाडू पंतप्रधानांच्या भेटीने भारावून गेले होते. तुमच्या कामगिरीने देशाचा गौरव उंचावला, अशा शब्दांत त्यांनी पदकविजेत्यांची पाठ थोपटली.
खेळाडूंचे कौतुक करतानाच त्यांनी वडीलकीच्या नात्याने त्यांना सल्लाही दिला. ते म्हणाले, ‘‘पदकविजेते खेळाडू यापुढेही असेच जमिनीवर राहतील आणि आपल्या उद्दिष्टपूर्तीपासून त्यांचे चित्त विचलित होऊ देणार नाहीत. या यशानंतर विश्रांती न घेता ऑलिंपिकमध्ये अधिक चांगले यश कसे मिळेल, यासाठी कठोर मेहनतीला सुरवात करतील. पदकविजेत्यांसमोर खऱ्या आव्हानाला आता कुठे सुरवात झाली आहे. ऑलिंपिकपदकाचे उद्दिष्ट ठेवूनच तयारीला सुरवात करा.’’
ग्रामीण भागात खऱ्या अर्थाने गुणवत्ता दडली असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचे सांगून मोदी म्हणाले, ‘‘खरी गुणवत्ता ग्रामीण भागात दडली आहे. अशा स्पर्धांमधून ती पुढे येते. आपण ही नैसर्गिक गुणवत्ता शोधण्याची मोहीम सातत्याने राबविली पाहिजे. त्याचबरोबर खेळाडूंनी आपल्या कामगिरीत सुधारणा करताना नव्या तंत्राचा अधिकाधिक वापर करायला हवा.’’

from News Story Feeds https://ift.tt/2wPlLKl
No comments:
Post a Comment