Cue3

Thursday, September 6, 2018

हॉकी विश्‍वकरंडकाचे उत्साहात अनावरण

भुवनेश्‍वर -  याच वर्षी भारतात होणाऱ्या हॉकी विश्‍वकरंडक स्पर्धेच्या करंडकाचे बुधवारी येथे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या हस्ते थाटात अनावरण करण्यात आले. त्याचबरोबर या करंडकाच्या राज्यातील विविध ठिकाणांच्या प्रवासाला सुरवात झाली. 

ओडिशातील बहुतेक जिल्ह्यांत हा करंडक फिरविण्याचा मनोदय असून, त्यासाठी सरकारने विशेष नियोजन केले आहे. क्रीडा व युवा संचालक विनील कृष्णा म्हणाले, ‘‘सरकारने हॉकी इंडियाकडून करंडकाच्या १८ प्रतिकृती मिळविल्या आहेत. आता पुढील दोन महिने या प्रतिकिृती विविध प्रमुख सार्वजनिक ठिकाणे आणि महत्त्वाच्या कार्यालयांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहेत. संपूर्ण राज्यातील प्रवासासाठी खास पद्धतीच्या सहा गाड्या तयार करण्यात आल्या आहेत. एक प्रतिकृती शहराच्या मध्यवस्तीत ठेवण्यात येणार असून, तेथे हॉकी चाहते करंडकासोबत ‘सेल्फी’ काढू शकतील.’’

करंडकाविषयी
वजन - ११,५६० ग्रॅम
रचना - १२०.८५ एमएमसच्या हस्तिदंताच्या भक्कम स्टॅंडवर चांदीचा कप, त्यावर चांदी आणि सोन्याचा मुलामा देऊन जगाची प्रतिकृती आणि सगळ्यात वरच्या बाजूला चेंडू आणि हॉकी स्टिक
धातूंचा वापर - ८९५ ग्रॅम सोने, ६,८१५ ग्रॅम चांदी, ३५० ग्रॅम हस्तिदंत आणि ३,५०० ग्रॅम सागवानाचे लाकूड
कुणी बनवला - पाकिस्तान हॉकी महासंघाचे तत्कालिक अध्यक्ष लेफ्टनंट जनरल के. एम. अझर खान यांच्या मार्गदर्शनाखाली १९७१ मध्ये पाकिस्तानच्या बशिर मुजिद या कलाकाराने हा करंडक घडवला.

News Item ID: 
51-news_story-1536220442
Mobile Device Headline: 
हॉकी विश्‍वकरंडकाचे उत्साहात अनावरण
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

भुवनेश्‍वर -  याच वर्षी भारतात होणाऱ्या हॉकी विश्‍वकरंडक स्पर्धेच्या करंडकाचे बुधवारी येथे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या हस्ते थाटात अनावरण करण्यात आले. त्याचबरोबर या करंडकाच्या राज्यातील विविध ठिकाणांच्या प्रवासाला सुरवात झाली. 

ओडिशातील बहुतेक जिल्ह्यांत हा करंडक फिरविण्याचा मनोदय असून, त्यासाठी सरकारने विशेष नियोजन केले आहे. क्रीडा व युवा संचालक विनील कृष्णा म्हणाले, ‘‘सरकारने हॉकी इंडियाकडून करंडकाच्या १८ प्रतिकृती मिळविल्या आहेत. आता पुढील दोन महिने या प्रतिकिृती विविध प्रमुख सार्वजनिक ठिकाणे आणि महत्त्वाच्या कार्यालयांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहेत. संपूर्ण राज्यातील प्रवासासाठी खास पद्धतीच्या सहा गाड्या तयार करण्यात आल्या आहेत. एक प्रतिकृती शहराच्या मध्यवस्तीत ठेवण्यात येणार असून, तेथे हॉकी चाहते करंडकासोबत ‘सेल्फी’ काढू शकतील.’’

करंडकाविषयी
वजन - ११,५६० ग्रॅम
रचना - १२०.८५ एमएमसच्या हस्तिदंताच्या भक्कम स्टॅंडवर चांदीचा कप, त्यावर चांदी आणि सोन्याचा मुलामा देऊन जगाची प्रतिकृती आणि सगळ्यात वरच्या बाजूला चेंडू आणि हॉकी स्टिक
धातूंचा वापर - ८९५ ग्रॅम सोने, ६,८१५ ग्रॅम चांदी, ३५० ग्रॅम हस्तिदंत आणि ३,५०० ग्रॅम सागवानाचे लाकूड
कुणी बनवला - पाकिस्तान हॉकी महासंघाचे तत्कालिक अध्यक्ष लेफ्टनंट जनरल के. एम. अझर खान यांच्या मार्गदर्शनाखाली १९७१ मध्ये पाकिस्तानच्या बशिर मुजिद या कलाकाराने हा करंडक घडवला.

Vertical Image: 
English Headline: 
CM Naveen Patnaik unveils Hockey World Cup trophy
सकाळ न्यूज नेटवर्क
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
भारत, हॉकी, hockey, विश्‍वकरंडक, World, करंडक, Trophy, मुख्यमंत्री, नवीन पटनाईक, Naveen Patnaik
Twitter Publish: 

from News Story Feeds https://ift.tt/2wL7T2U

No comments:

Post a Comment