Cue3

Friday, September 7, 2018

महाराष्ट्राच्या देविका, मधुरा, सना अंतिम फेरीत

नागपूर - यजमान महाराष्ट्राच्या मधुरा पाटील, देविका घोरपडे व सना गोन्साल्विस यांनी आगेकूच कायम ठेवत १४ वर्षांखालील मुलींच्या महापौर चषक राष्ट्रीय सबज्युनियर मुष्टियुद्ध स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. सिमरन वर्मा, स्वप्ना चव्हाण, श्रेया सावंत व साक्षी वाघिरे यांचे आव्हान संपुष्टात आले. 

ऑलिंपियन मनोज पिंगळे यांच्याकडे मार्गदर्शन घेणाऱ्या पुण्याच्या देविकाने ४६ किलो वजनगटात जोरदार ठोसे लगावत उपांत्य फेरीत आसामच्या प्रियाखीला पराभूत केले. देविकाच्या आक्रमकतेपुढे प्रियाखीचे काहीच चालले नाही. रायगडच्या मधुराने ५२ किलो वजनगटात उत्तराखंडच्या कोमल धामी आणि पालघरच्या सनाने ६० किलो वजनगटात हरियानाच्या प्रियांकाला पराभूत केले. तिघीही शुक्रवारी सुवर्णपदकासाठी झुंजणार आहेत. महाराष्ट्राच्या अन्य मुष्टियोद्‌ध्यांना पराभवाचा धक्‍का सहन करावा लागला.

मुंबई उपनगरच्या सिमरनला (५० किलो) हरियानाच्या खुशीने, साताऱ्याच्या स्वप्नाला (४८ किलो) उत्तराखंडच्या निवेदिता कार्कीने,  मुंबई उपनगरच्या श्रेया सावंतला (४४ किलो) उत्तराखंडच्या मोनिकाकडून १-४ ने आणि औरंगाबादच्या साक्षी वाघिरेला (४० किलो) हरियानाच्या प्राची किन्हाने पराभूत केले. 

अन्य निकाल (उपांत्यफेरी) : ३४ किलो : मुस्कान (हरियाना) वि. वि. मधू पुष्कर (मध्य प्रदेश), भावना (पंजाब) वि.वि. निधी (उत्तर प्रदेश). ३६ किलो : एम. लोशिनी (तमिळनाडू) वि. वि. संजना (एयूपी), निशा (हरियाना) वि. वि. श्‍वेता (झारखंड). ३८ किलो : परिणिता (हरियाना) वि. वि. आराधना (दादरा व नगर हवेली), वेनिका चानू (मणिपूर) वि. वि. पिंकी (पंजाब). 
 
News Item ID: 
51-news_story-1536308861
Mobile Device Headline: 
महाराष्ट्राच्या देविका, मधुरा, सना अंतिम फेरीत
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

नागपूर - यजमान महाराष्ट्राच्या मधुरा पाटील, देविका घोरपडे व सना गोन्साल्विस यांनी आगेकूच कायम ठेवत १४ वर्षांखालील मुलींच्या महापौर चषक राष्ट्रीय सबज्युनियर मुष्टियुद्ध स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. सिमरन वर्मा, स्वप्ना चव्हाण, श्रेया सावंत व साक्षी वाघिरे यांचे आव्हान संपुष्टात आले. 

ऑलिंपियन मनोज पिंगळे यांच्याकडे मार्गदर्शन घेणाऱ्या पुण्याच्या देविकाने ४६ किलो वजनगटात जोरदार ठोसे लगावत उपांत्य फेरीत आसामच्या प्रियाखीला पराभूत केले. देविकाच्या आक्रमकतेपुढे प्रियाखीचे काहीच चालले नाही. रायगडच्या मधुराने ५२ किलो वजनगटात उत्तराखंडच्या कोमल धामी आणि पालघरच्या सनाने ६० किलो वजनगटात हरियानाच्या प्रियांकाला पराभूत केले. तिघीही शुक्रवारी सुवर्णपदकासाठी झुंजणार आहेत. महाराष्ट्राच्या अन्य मुष्टियोद्‌ध्यांना पराभवाचा धक्‍का सहन करावा लागला.

मुंबई उपनगरच्या सिमरनला (५० किलो) हरियानाच्या खुशीने, साताऱ्याच्या स्वप्नाला (४८ किलो) उत्तराखंडच्या निवेदिता कार्कीने,  मुंबई उपनगरच्या श्रेया सावंतला (४४ किलो) उत्तराखंडच्या मोनिकाकडून १-४ ने आणि औरंगाबादच्या साक्षी वाघिरेला (४० किलो) हरियानाच्या प्राची किन्हाने पराभूत केले. 

अन्य निकाल (उपांत्यफेरी) : ३४ किलो : मुस्कान (हरियाना) वि. वि. मधू पुष्कर (मध्य प्रदेश), भावना (पंजाब) वि.वि. निधी (उत्तर प्रदेश). ३६ किलो : एम. लोशिनी (तमिळनाडू) वि. वि. संजना (एयूपी), निशा (हरियाना) वि. वि. श्‍वेता (झारखंड). ३८ किलो : परिणिता (हरियाना) वि. वि. आराधना (दादरा व नगर हवेली), वेनिका चानू (मणिपूर) वि. वि. पिंकी (पंजाब). 
 
Vertical Image: 
English Headline: 
Devika, Madhura of Maharashtra, Sanaa in the final round
सकाळ वृत्तसेवा
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
महाराष्ट्र, Maharashtra, मुष्टियुद्ध, Boxing, हरियाना, मुंबई, Mumbai, मध्य प्रदेश, Madhya Pradesh, पंजाब, उत्तर प्रदेश, तमिळनाडू, झारखंड, मणिपूर
Twitter Publish: 

from News Story Feeds https://ift.tt/2wQccdU

No comments:

Post a Comment