ढाका - ‘सॅफ’ फुटबॉल स्पर्धेत विजेतेपद मिळवायचे असल्यास याहून अधिक चांगला खेळ करावा लागेल, असे भारतीय संघाचे प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टटाइन यांनी खेळाडूंना सांगितले आहे.
भारताने श्रीलंकेवर २-० असा विजय मिळवून शानदार सुरवात केली. तरी झालेल्या चुकांमुळे मोठा विजय दुरावला, असे कॉन्स्टटाइन यांचे म्हणणे आहे. ते म्हणाले, ‘‘आम्ही मोठ्या विजयापासून दूर राहिलो. ज्या चुका या सामन्यात झाल्या त्या सुधारून शनिवारी मालदीवविरुद्ध अधिक तयारीने आम्हाला उतरावे लागेल. श्रीलंकेविरुद्ध ज्या पद्धतीने खेळ केला, त्यापेक्षा अधिक चांगला खेळ आम्ही करू शकतो. खेळाडू तरुण आहेत, प्रत्येकवेळेस सातत्य राखता येणार नाही हे जरी खरे असले, तरी शंभर टक्के योगदान द्यायलाच हवे.’’
सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू ठरलेल्या आशिकी कुरुनियन यानेदेखील अशीच काहीशी भावना व्यक्त केली. तो म्हणाला, ‘‘आम्ही जिंकलो, हे खरे असले तरी गोल करण्याच्या अनेक संधी आम्ही दवडल्या या विसरून चालणार नाही. अशा संधी साधण्यासाठी आम्हाला मैदानात अधिक तत्पर राहायला हवे. पहिला आंतरराष्ट्रीय गोल करू शकलो, याचा आनंद आहेच.’’

from News Story Feeds https://ift.tt/2O1KEss
No comments:
Post a Comment