बर्लिन ः कोरोनाच्या आक्रमणानंतर व्यावसायिक फुटबॉल लीग पहिल्यांदा सुरू करण्याचा मान जर्मनीने मिळवला होता. आता लांबलेल्या मोसमातील पहिले लीग विजेतेपदही जर्मनीने मिळवले. बायर्न म्युनिचने सलग आठव्यांदा बंडेस्लीगामध्ये बाजी मारली.
काय म्हणावे या हिमतीला... चक्क पोलिस मुख्यालयातीलच एटीएम फोडले...
रॉबर्ट लेवांडस्कीने जेरोमी बोएतेंगच्या अचूक पासवर चेंडूला अचूक दिशा दिला आणि बायर्नला वेर्डेर ब्रेमनविरुद्ध 1-0 असा विजय मिळवून दिला. त्यामुळे बायर्नचे विजेतेपद दोन सामने असतानाच निश्चित झाले. त्यांनी स्पर्धेतील सलग अकरावा विजय मिळवताना बोरुसिया डॉर्टमंडला दहा गुणांनी मागे टाकले. डॉर्टमंडचे तीनच सामने शिल्लक असल्यामुळे ते आता बायर्नला मागे टाकू शकणार नाहीत.
भाजप नेता मोहित कंबोज यांच्यावर सीबीआयने केला गुन्हा दाखल; वाचा नेमकं प्रकरण काय....
बायर्नचा खेळ विजेत्या संघास साजेसा नव्हता. लेवांडस्कीने स्पर्धेतील या मोसमात केलेला विक्रमी 31 वा गोल हीच त्यांच्यासाठी महत्त्वाची बाब ठरली. बायर्नपेक्षा त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांनी गोलच्या जास्त संधी निर्माण केल्या. ब्रेमनची अखेरच्या मिनिटातील पेनल्टी किकची मागणी फेटाळली गेली आणि बायर्नच्या चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
घरखरेदीने सरकारच्या तिजोरीला मिळाला आधार; लॉकडाऊनमध्ये 'इतक्या' कोटींची महसूलप्राप्ती...
रिकाम्या स्टेडियममध्येही चाहत्यांचे आभार
गतमोसमात बायर्नने विजेतेपद निश्चित करताना एइनत्राश्त फ्रॅंकफर्टला 5-1 असे हरवले होते, त्या वेळी 75 हजार चाहते मैदानात होते. या वेळी मैदानात चाहते नव्हते; पण भरपावसात झालेली ही लढत संपल्यावर बायर्न संघातील खेळाडूंनी उड्या मारत आनंद साजरा केला. चाहते स्टेडियम आहेत हे समजून त्यांचे आभारही मानले.
बीसीसीआयचा आयसीसीशी पंगा; आयपीएल घेणारच...
1-5 पराभव ते विजेतेपद
- नोव्हेंबरमध्ये एइनत्राश्त फ्रॅंकफर्टविरुद्धच्या 1-5 पराभवानंतर चौथ्या क्रमांकावर
- या पराभवानंतर बायर्नने मार्गदर्शक निको कोवाक यांना दूर केले,
- सध्या बायर्नची 66 पैकी 58 गुणांची कमाई
- डेव्हिड अल्बा, थॉमस मुएल्लर हे नवव्यांदा बंडेस्लिगा विजेत्या संघातील खेळाडू
- सध्याचे मार्गदर्शक हॅन्सी फ्लीक यांनी खेळाडू म्हणून बायर्नच्या चार जेतेपदात मोलाचा वाटा
- बायर्नचे हे एकंदर तिसावे जर्मन लीग विजेतेपद. सर्वाधिक विजेतेपदांच्या स्पर्धेत युव्हेंटिस (35) आणि रेयाल माद्रिद (33) यांच्यापाठोपाठ आता बायर्न म्युनिक.
from News Story Feeds https://ift.tt/3fCBHDk
No comments:
Post a Comment