Cue3

Thursday, February 20, 2020

Tokyo Olympic 2020 : ड्रॅगनच्या ऑलिंपिक वर्चस्वास कोरोनाचा फटका?

बीजिंग : शतकातील प्रत्येक ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत चीन अव्वल आला आहे; पण ड्रॅगनच्या या वर्चस्वास कोरोनाचा मोठा फटका बसणार, असे दिसत आहे. ऑलिंपिक वर्षात त्यांच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा सहभागावरच नव्हे, तर ऑलिंपिक पात्रता स्पर्धा सहभागावरही परिणाम झाला आहे. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ऑलिंपिकसाठी पात्र ठरलेल्या किंवा पात्रतेची संधी असलेल्या एकाही चिनी खेळाडूस कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त नाही; पण त्यांचे झटके त्यांना बसले आहेत. आता ऑस्ट्रेलियाने ऑलिंपिक पात्रता महिला फुटबॉल स्पर्धेसाठी आपले दरवाजे चीन संघासाठी खुले केले; पण हे सर्वच ठिकाणी घडण्याची शक्‍यता नाही.

- Video : धोनी आणि मंडळींची 'मैफिल-ए-बाथरूम'; व्हिडीओ होतोय व्हायरल! 

फेब्रुवारी ते एप्रिलदरम्यान जगभरात शंभर ऑलिंपिक पात्रता स्पर्धा होतील. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने यजमान देशांना आमच्या खेळाडूंना शक्‍य तितके साह्य करण्यास सांगितले आहे, असे चीन ऑलिंपिक समितीचे उपाध्यक्ष लिऊ गुओयॉंग यांनी सांगितले; पण किती देश यास तयार होतील, हा प्रश्नच आहे.

- T20 World Cup : वर्ल्डकपचा रणसंग्राम उद्यापासून; टीम इंडियासमोर कांगारुंचे तगडे आव्हान!​ 

चीनचा महिला फुटबॉल संघ ऑस्ट्रेलियात ऑलिंपिक पात्रता स्पर्धेत खेळत आहे; पण या संघातील वुहानमधील वॅंग शॉंग घरच्या छतावर मास्क लावून सराव करीत आहे. आता चीन महिला फुटबॉल संघ नशीबवान म्हणायला हवा. त्यांच्या महिला हॅंडबॉल संघास हंगेरीतील पात्रता स्पर्धेतून माघार घेणे भाग पडले.

मेलबर्नच्या विश्वकरंडक पात्रता जिम्नॅस्टिक मालिका स्पर्धेतही चीन स्पर्धक नसतील. चीनमधील बॉक्‍सिंग, बास्केटबॉल, सेलिंगच्या ऑलिंपिक पात्रता स्पर्धा अन्यत्र होतील. चीनची ताकद असलेल्या बॅडमिंटन तसेच टेबल टेनिस संघाचा सराव यापूर्वीच चीनबाहेर सुरू झाला आहे; पण ज्युदो संघ तेवढा नशीबवान नाही. त्यांची पॅरिस ग्राप्रि स्पर्धा हुकली आहे. 

- INDvsNZ : वेलिंग्टनवर बॅटिंग करायची तर...? रहाणेचा टीम इंडियाला कानमंत्र!

ऑलिंपिकसाठी संघ किती सदस्यांचा? 

चीनचा मॉडर्न पेंटथलॉन संघ इजिप्त स्पर्धेतील पूर्वतयारी करीत आहे. संघटनेचे पदाधिकारी या संघाच्या प्रवासाची तसेच देशाबाहेरील शिबिराची तयारी करीत आहेत. चीनचे ऍथलिटस्‌ ट्रेड मिलवर धावत आहेत. अश्वारोहणातील स्पर्धकांचा ताप रोज दोनदा बघितला जात आहे. आता या परिस्थितीत चीनच्या किती सदस्यांचा संघ ऑलिंपिकसाठी असेल, हा प्रश्नच आहे.

News Item ID: 
599-news_story-1582223572
Mobile Device Headline: 
Tokyo Olympic 2020 : ड्रॅगनच्या ऑलिंपिक वर्चस्वास कोरोनाचा फटका?
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

Vertical Image: 
English Headline: 
Coronavirus may impact on China medals in Tokyo Olympics 2020
Author Type: 
External Author
वृत्तसंस्था
Search Functional Tags: 
ऑलिंपिक, Olympics, चीन, ऑस्ट्रेलिया, फुटबॉल, football, हॅंडबॉल, hendabola, बॅडमिंटन, Badminton, टेबल टेनिस, table tennis, टेनिस, पॅरिस, इजिप्त, शीर्षक, ठिकाणे, टोकियो, टोकियो ऑलिंपिक्स
Twitter Publish: 
Meta Description: 
Marathi News about China Olympic and Coronavirus: शतकातील प्रत्येक ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत चीन अव्वल आला आहे; पण ड्रॅगनच्या या वर्चस्वास कोरोनाचा मोठा फटका बसणार, असे दिसत आहे. ऑलिंपिक वर्षात त्यांच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा सहभागावरच नव्हे, तर ऑलिंपिक पात्रता स्पर्धा सहभागावरही परिणाम झाला आहे. 
Send as Notification: 
Topic Tags: 

from News Story Feeds https://ift.tt/2TfgINJ

No comments:

Post a Comment