वेलिंग्टन : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंड सर्वच आघाड्य़ांवर सर्वोत्तम कामगिरी करत भारताचा दारुण पराभव केला आहे. न्यूझीलंडने भारतावर दहा गडी राखून विजय मिळवला. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील भारताचा हा पहिला पराभव आहे. न्यूझीलंडने सर्वोत्तम कामगिरी करत भारताची सलग सात कसोटींमध्ये विजयाची घोडदौड रोखली आहे.
चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरवात झाल्यावर भारताच्या चार बाद 144 धावा होत्या आणि न्यूझीलंडकडे 39 धावांची आघाडी होती. भारतीय संघ आता काय चमत्कार करतो हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक होते मात्र, टीम साउदीने भेदक गोलंदाजी करत भारताचा डाव 191 धावांमध्येच गुंडाळला. भारताकडे असलेली केवळ नऊ धावांची आघाडी किवींनी दहा चेंडूमध्येच पार केली आणि भारतावर दहा विकेट राखून दणदणीत विजय मिळवला.
पहिल्या डावात खराब कामगिरी केल्यानंतर दुसऱ्या डावात तरी भारतीय फलंदाज चांगली कामगिरी करतील अशी अपेक्षा चाहत्यांना होता मात्र, ती आशा केवळ 21 चेंडूच टिकली. चौथ्या दिवसाच्या तिसऱ्याच षटकात अजिंक्य रहाणे 29 धावांवर बाद झाला. त्याच्यापाठोपाठ पुढच्याच षटकात हनुमा विहारी 15 धावांवर बाद झाला. रिषभ पंत आणि ईशांत शर्मा यांनी भारताला नावापुरती आघाडी मिळवून दिली. न्यूझीलंडने केवळ 79 मिनिटांमध्ये भारताला डाव गुंडाळला. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील हा 11वा पराभव आहे आणि या सगळ्या सामन्यांमध्ये त्याने नाणेफेक गमावली आहे.

from News Story Feeds https://ift.tt/38RGuOA
No comments:
Post a Comment