वेलिंग्टन : अनुभवी टीम साउदी आणि पदार्पण करणार्या कायल जेमीसनने प्रत्येकी चार फलंदाजांना बाद करून भारताच्या पहिल्या डावाची दाणादाण उडवली. भारताचा पहिला डाव 165 धावांमधे गुंडाळण्यात न्युझिलंड संघाला आलेले यश सामन्याचे भवितव्य ठरवणारे आहे. भारताकडून सर्वाधिक धावा अजिंक्य रहाणेच्या त्याही फक्त 46 होत्या याचा विचार करता दर्जेदार स्वींग गोलंदाजी समोर भारतीय फलंदाजांचे झालेले हाल लक्षात येऊ शकतात.
What a start to the day for New Zealand!
A run out, followed up next ball by a textbook out-swinger from Tim Southee to take the top of off! #NZvIND pic.twitter.com/uDMrwrjXxb
— ICC (@ICC) February 21, 2020
दुसर्या दिवशीच्या खेळाला सुरुवात झाल्यावर अहो आश्चर्यम म्हणजे केन विल्यमसनने डावखुर्या फिरकी गोलंदाज एजाज पटेलला संधी दिली. रिषभ पंतने ती योजना बघून जिभल्या चाटल्या आणि एजाज पटेलला उत्तुंग षटकार मारला. लगेच केन विल्यमसनने चूक सुधारून वेगवान गोलंदाजांना मारा करायला बोलावले. भारताला पहिला धक्का गोलंदाजांनी नव्हे तर धावा पळताना खराब सामंजस्याने दिला. अजिंक्य रहाणेने चेंडू मोकळ्या जागेत मारून सहजी एक धाव असल्याचे सांगत पळायला सुरुवात केली. रिषभ पंतने चार पावले पुढे येऊन मग नकार देण्याची चूक केली. परिणामी अजिंक्य रहाणे पळत राहिला आणि रिषभ पंत धावबाद झाला.
मुख्य फलंदाजांची जोडी फुटल्याचा धागा पकडत मग टीम साउदीने प्रथम रहाणेला आणि पुढच्याच चेंडूवर अश्विनला बाद करून भारतीय फलंदाजीला हादरे दिले. महंमद शमीने हाणामारी करून 20 धावा केल्याने भारताला 150 धावांचा टप्पा ओलांडता आला. छाप पाडणार्या कायल जेमीसनने चिवट फलंदाजी करण्यात पटाईत असलेल्या ईशांत शर्माला बाद केले. समोरून टीम साउदीला मोठा फटका मारताना शमी बाद झाला आणि भारताचा पहिला डाव 165 धावांवर आटोपला. साउदीने चार फलंदाज 49 तर जेमीसनने चार फलंदाज 39 धावांत तंबूत पाठवले.

from News Story Feeds https://ift.tt/2uUGkY1
No comments:
Post a Comment