पुणे - महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशनच्या (एमएसएलटीए) वतीने आणि महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने आयोजित तिसऱ्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत एकेरी गटात दक्षिण कोरियाच्या क्वान सून-वूने भारताच्या प्रजनेश गुनेश्वरनचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. प्रजनेशच्या पराभवासह स्पर्धेतील भारताचे आव्हानही संपले.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
दक्षिण कोरियाच्या क्वानने भारताच्या राष्ट्रीय क्रमांक असेलेल्या प्रजनेशचा ६-३, ७-६(५) असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. १ तास ४४ मिनिटे चाललेल्या सामन्यात पहिल्या सेटमध्ये पहिल्या गेममध्ये प्रजनेशने क्वानची सर्व्हिस भेदत सामन्यात यशस्वी सुरुवात केली. मात्र पुढे दुसऱ्या गेममध्ये क्वानने प्रजनेशची सर्व्हिस ब्रेक करत सामना १-१ असा बरोबरीत आणला. सहाव्या गेममध्ये क्वानने प्रजनेशची सर्व्हिस भेदली आणि सातव्या गेममध्ये स्वतःची सर्व्हिस राखत ५-२ अशी भक्कम आघाडी घेतली. नवव्या गेममध्ये स्वतःची सर्व्हिस राखत पहिला सेट ६-३ असा जिंकला. दुसऱ्या गेममध्ये सामना बाराव्या गेमपर्यंत ६-६ असा बरोबरीत राहिल्याने टायब्रेक झाला. टायब्रेकमध्ये क्वानने आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत ७-६(५) असा टायब्रेक जिंकत सामन्यात ६-३, ७-६(५) असा विजय मिळवला.

from News Story Feeds https://ift.tt/2GZH4x9
No comments:
Post a Comment