Cue3

Friday, January 24, 2020

INDvsNZ : मॅच जिंकल्यावर विराट म्हणाला, '...त्या गोष्टींचा विचार करत बसलो की मन भरटकतं!'

ऑकलंड : 'जेटलॅग'बाबत मी बोललोच नव्हतो, तसेच कारणे द्यायला आम्हाला आवडत नाही, ज्या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत त्याचा विचार करत बसलो, तर आपले लक्ष मूळ उद्दिष्टापासून दूर जाते, असे स्पष्ट मत मांडत विराट कोहलीने दोन दिवसांतच येथे दाखल होत मिळवलेल्या विजयावर समाधान व्यक्त केले. अशा प्रकारच्या शानदार विजयाने मालिकेची योग्य सुरुवात होते, असेही तो म्हणाला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रविवारी चिन्नास्वामी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना खेळल्यानंतर तेथूनच टीम इंडिया न्यूझीलंडला रवाना झाली. दोन दिवसांपूर्वी येथे आल्यानंतर द्विशतकी धावांचे आव्हान पार करून न्यूझीलंडमध्ये आत्तापर्यंतचा केवळ दुसरा विजय मिळवला. दोन मालिकांमध्ये प्रवास आणि विश्रांतीसाठी पुरेसा वेळ नसल्यामुळे विराटने काल सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत बोलताना दौरा कार्यक्रमावर टीका केली होती. 

- INDvsNZ : 200 पेक्षा जास्त रन्सचं टार्गेट गाठायचंय? डोण्ट वरी, राहुल आहे ना!

बंगळूर-ऑकलंड प्रवास त्यानंतर लगेचच सामना आणि त्यात विजय एकूणच या घटनाक्रमाचा आम्ही आनंद घेतला. आत्मविश्‍वास मिळवून देणाऱ्या या विजयाने न्यूझीलंडमधील मालिकेला चांगली सुरुवात झाली. सामना ऑकलंडला असला तरी 80 टक्के प्रेक्षक भारतीय होते आणि त्यांचा पाठिबा 200 पेक्षा अधिक धावांचे आव्हान पार करायला मोलाचा ठरला, असे विराटने सामन्यानंतर सांगितले. 

- भारताचा 'हा' मराठमोळा बॉलर निवड समितीच्या शर्यतीत!

ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला सामना गमावल्यानंतर पुढचे दोन सामने जिंकत भारताने मालिका 2-1 अशी जिंकली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून मिळालेल्या आत्मविश्‍वासाचा आम्हाला येथे फायदा झाला. फलंदाजीस उपयुक्त असलेली खेळपट्टी आणि जवळ असलेली सीमारेषा यामुळे गोलंदाजांना दोष देणे योग्य नाही. तरीही आम्ही न्यूझीलंडला दोनशे धावांच्या जवळपास रोखले. त्यांची सुरुवातीची फलंदाजी पाहिली तर 230 धावा आम्ही अपेक्षित केल्या होत्या, असे विराट म्हणाला. 

- विराट राहुलला म्हणाला 'ग्लोव्ह्ज घाल' अन् रिषभ पंत राहिला 'बेंचवर'

क्षेत्ररक्षणात सुधारणा हवी 

अजूनही आम्हाला क्षेत्ररक्षणात सुधारणा करणे आवश्‍यक आहे. येथील स्टेडियम आयताकृती असल्यामुळे सीमारेषांवर वेगळ्या प्रकारचे कोन तयार होतात, अशा ठिकाणी चेंडू अडवणे आव्हानात्मक असते. त्याची सवय करून घ्यावी लागेल, असे कोहलीने सांगितले.

News Item ID: 
599-news_story-1579881427
Mobile Device Headline: 
INDvsNZ : मॅच जिंकल्यावर विराट म्हणाला, '...त्या गोष्टींचा विचार करत बसलो की मन भरटकतं!'
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

Vertical Image: 
English Headline: 
Indian skipper Virat Kohli commented about victory against New Zealand
Author Type: 
External Author
वृत्तसंस्था
Search Functional Tags: 
भारत, ऑस्ट्रेलिया, बंगळूर, न्यूझीलंड, विराट कोहली
Twitter Publish: 
Meta Description: 
Marathi News about Virat Kohli: 'जेटलॅग'बाबत मी बोललोच नव्हतो, तसेच कारणे द्यायला आम्हाला आवडत नाही, ज्या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत त्याचा विचार करत बसलो, तर आपले लक्ष मूळ उद्दिष्टापासून दूर जाते, असे स्पष्ट मत मांडत विराट कोहलीने दोन दिवसांतच येथे दाखल होत मिळवलेल्या विजयावर समाधान व्यक्त केले.
Send as Notification: 
Topic Tags: 

from News Story Feeds https://ift.tt/36tEGZP

No comments:

Post a Comment