Cue3

Thursday, January 2, 2020

हॉकीपटू सुनिताची गुडघा दुखापतीमुळे निवृत्त

मुंबई : गुडघा दुखापतीचा सातत्याने त्रास होत असल्याने अनुभवी हॉकी बचावपटू सुनिता लाक्राने आंतरराष्ट्रीय लढतीतून निवृत्त होण्याचे ठरवले आहे. आता नव्याने शस्त्रक्रियेची आवश्‍यकता असल्यामुळे ऑलिंपिकला मुकणार हे स्पष्ट आहे, त्यामुळे निवृत्त होणेच चांगले, असे सुनिताने सांगितले.

दोन वर्षांपूर्वी (2018) आशियाई चॅम्पियन्स स्पर्धेतील उपविजेत्या संघाची कर्णधार सुनिताचा 2014 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ब्रॉंझ जिंकलेल्या संघातही समावेश होता. ती एकंदर 139 सामने खेळली. "रिओ ऑलिंपिक स्पर्धा खेळण्याची संधी मिळाली हे माझे सुदैवच. त्यावेळी भारतीय महिला हॉकी संघ तीन दशकांनंतर ऑलिंपिक स्पर्धेत खेळला होता. आता टोकियो ऑलिंपिक खुणावत होते, पण गुडघा दुखापतीने माझे स्वप्न भंग केले,' असे सुनिताने सांगितले.

सुनिताने आंतरराष्ट्रीय हॉकीचा निरोप घेतला असला तरी ती देशांतर्गत स्पर्धांत खेळणार आहे. "खेळानेच मला सर्व काही दिले. त्यामुळेच मी प्रगती केली. भारतीय संघ माझ्यासाठी एक कुटुंबच होता. अनेक दुखापती झाल्या, पण त्यावेळी हॉकी इंडियाने साथ दिली. कुटुंबीयांनी दिलेली साथ विसरूच शकत नाही,' असेही तिने सांगितले.
तब्बल अकरा वर्षे सुनिता भारतीय संघाचा अविभाज्य भाग झाली होती. तिची उणीव आम्हाला मैदानात नक्कीच भासेल, तसेच मैदानाबाहेरही तिच्या मार्गदर्शनास मुकणार आहोत, असे भारताची कर्णधार राणी रामपाल हिने सांगितले.

News Item ID: 
599-news_story-1577983852
Mobile Device Headline: 
हॉकीपटू सुनिताची गुडघा दुखापतीमुळे निवृत्त
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

मुंबई : गुडघा दुखापतीचा सातत्याने त्रास होत असल्याने अनुभवी हॉकी बचावपटू सुनिता लाक्राने आंतरराष्ट्रीय लढतीतून निवृत्त होण्याचे ठरवले आहे. आता नव्याने शस्त्रक्रियेची आवश्‍यकता असल्यामुळे ऑलिंपिकला मुकणार हे स्पष्ट आहे, त्यामुळे निवृत्त होणेच चांगले, असे सुनिताने सांगितले.

दोन वर्षांपूर्वी (2018) आशियाई चॅम्पियन्स स्पर्धेतील उपविजेत्या संघाची कर्णधार सुनिताचा 2014 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ब्रॉंझ जिंकलेल्या संघातही समावेश होता. ती एकंदर 139 सामने खेळली. "रिओ ऑलिंपिक स्पर्धा खेळण्याची संधी मिळाली हे माझे सुदैवच. त्यावेळी भारतीय महिला हॉकी संघ तीन दशकांनंतर ऑलिंपिक स्पर्धेत खेळला होता. आता टोकियो ऑलिंपिक खुणावत होते, पण गुडघा दुखापतीने माझे स्वप्न भंग केले,' असे सुनिताने सांगितले.

सुनिताने आंतरराष्ट्रीय हॉकीचा निरोप घेतला असला तरी ती देशांतर्गत स्पर्धांत खेळणार आहे. "खेळानेच मला सर्व काही दिले. त्यामुळेच मी प्रगती केली. भारतीय संघ माझ्यासाठी एक कुटुंबच होता. अनेक दुखापती झाल्या, पण त्यावेळी हॉकी इंडियाने साथ दिली. कुटुंबीयांनी दिलेली साथ विसरूच शकत नाही,' असेही तिने सांगितले.
तब्बल अकरा वर्षे सुनिता भारतीय संघाचा अविभाज्य भाग झाली होती. तिची उणीव आम्हाला मैदानात नक्कीच भासेल, तसेच मैदानाबाहेरही तिच्या मार्गदर्शनास मुकणार आहोत, असे भारताची कर्णधार राणी रामपाल हिने सांगितले.

Vertical Image: 
English Headline: 
Defender Sunita Lakra retires due to Injury
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
हॉकी, hockey, ऑलिंपिक, Olympics, कर्णधार, director, रिओ ऑलिंपिक, Day, भारत
Twitter Publish: 
Meta Description: 
Defender Sunita Lakra retires due to Injury गुडघा दुखापतीचा सातत्याने त्रास होत असल्याने अनुभवी हॉकी बचावपटू सुनिता लाक्राने आंतरराष्ट्रीय लढतीतून निवृत्त होण्याचे ठरवले आहे. आता नव्याने शस्त्रक्रियेची आवश्‍यकता असल्यामुळे ऑलिंपिकला मुकणार हे स्पष्ट आहे, त्यामुळे निवृत्त होणेच चांगले, असे सुनिताने सांगितले.
Send as Notification: 

from News Story Feeds https://ift.tt/36ky3Kb

No comments:

Post a Comment