Cue3

Friday, January 10, 2020

ऑस्ट्रेलियन टेनिसला वणव्याचा धोका

मेलबर्न : ऑस्ट्रेलियात चांगलाच धुमसत असलेला वणवा ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेच्या संयोजनातही अडथळा ठरण्याची भीती व्यक्त होत आहे. देशातील 80 हजार चौरस किलोमीटर परिसरात सध्या वणवा पसरलेला आहे.

ऑस्ट्रेलियन स्पर्धा मेलबर्नला आहे. ते व्हिक्‍टोरियात येते. त्या राज्यातही वणवा आहे. अद्याप वणवा असलेल्या भागातून मेलबर्नच्या दिशेने वारे वाहत नाहीत, त्यामुळे तेथील प्रदूषण वाढलेले नाही, पण गेल्या आठवड्यात एक दिवस धूर अचानक वाढल्याने स्पर्धेबाबत शंका घेतली जात आहे.

टेनिस ऑस्ट्रेलियाचे सीईओ क्रेग टिली यांनी हवामान अनुकूल असल्यामुळे स्पर्धा पुढे ढकलली जाण्याची शक्‍यता नसल्याचे सांगितले.
सध्या वणवा मेलबर्नच्या पूर्वेला आहे. वाऱ्याच्या दिशा बदलल्यास प्रदूषणाचा खूप त्रास होईल, असा इशारा दिला जात आहे. अस्थमाचा त्रास असलेल्या खेळाडूंना सध्याच्या वातावरणाचाही त्रास होऊ शकतो, असे काहींचे मत आहे. सुदृढ व्यक्तींच्या आरोग्यावरही प्रदूषण वाढल्यास दूरगामी परिणाम होऊ शकतात, असे सांगितले जात आहे.

ऑस्ट्रेलियन स्पर्धा होणाऱ्या मेलबर्न पार्कवर तीन आच्छादित होऊ शकणारी तर आठ बंदिस्त कोर्ट आहेत. मात्र त्याचा फारसा उपयोग होणार नाही, असे सांगितले जात आहे. त्याचबरोबर स्पर्धेच्यावेळी अतिरिक्त सराव केल्यास त्याचाही त्रास होऊ शकेल, असे सांगण्यात येत आहे.

News Item ID: 
599-news_story-1578676178
Mobile Device Headline: 
ऑस्ट्रेलियन टेनिसला वणव्याचा धोका
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

मेलबर्न : ऑस्ट्रेलियात चांगलाच धुमसत असलेला वणवा ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेच्या संयोजनातही अडथळा ठरण्याची भीती व्यक्त होत आहे. देशातील 80 हजार चौरस किलोमीटर परिसरात सध्या वणवा पसरलेला आहे.

ऑस्ट्रेलियन स्पर्धा मेलबर्नला आहे. ते व्हिक्‍टोरियात येते. त्या राज्यातही वणवा आहे. अद्याप वणवा असलेल्या भागातून मेलबर्नच्या दिशेने वारे वाहत नाहीत, त्यामुळे तेथील प्रदूषण वाढलेले नाही, पण गेल्या आठवड्यात एक दिवस धूर अचानक वाढल्याने स्पर्धेबाबत शंका घेतली जात आहे.

टेनिस ऑस्ट्रेलियाचे सीईओ क्रेग टिली यांनी हवामान अनुकूल असल्यामुळे स्पर्धा पुढे ढकलली जाण्याची शक्‍यता नसल्याचे सांगितले.
सध्या वणवा मेलबर्नच्या पूर्वेला आहे. वाऱ्याच्या दिशा बदलल्यास प्रदूषणाचा खूप त्रास होईल, असा इशारा दिला जात आहे. अस्थमाचा त्रास असलेल्या खेळाडूंना सध्याच्या वातावरणाचाही त्रास होऊ शकतो, असे काहींचे मत आहे. सुदृढ व्यक्तींच्या आरोग्यावरही प्रदूषण वाढल्यास दूरगामी परिणाम होऊ शकतात, असे सांगितले जात आहे.

ऑस्ट्रेलियन स्पर्धा होणाऱ्या मेलबर्न पार्कवर तीन आच्छादित होऊ शकणारी तर आठ बंदिस्त कोर्ट आहेत. मात्र त्याचा फारसा उपयोग होणार नाही, असे सांगितले जात आहे. त्याचबरोबर स्पर्धेच्यावेळी अतिरिक्त सराव केल्यास त्याचाही त्रास होऊ शकेल, असे सांगण्यात येत आहे.

Vertical Image: 
English Headline: 
bushfire may hamper australian tennis
Author Type: 
External Author
वृत्तसंस्था
Search Functional Tags: 
ऑस्ट्रेलिया, टेनिस, स्पर्धा, Day, प्रदूषण, हवामान, आरोग्य, Health
Twitter Publish: 
Meta Description: 
bushfire may hamper australian tennis ऑस्ट्रेलियात चांगलाच धुमसत असलेला वणवा ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेच्या संयोजनातही अडथळा ठरण्याची भीती व्यक्त होत आहे. देशातील 80 हजार चौरस किलोमीटर परिसरात सध्या वणवा पसरलेला आहे.
Send as Notification: 

from News Story Feeds https://ift.tt/2R57jqD

No comments:

Post a Comment