सांगवडेवाडी : सांगवडेवाडी (ता.करवीर) मधील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेने श्रमदानातून परस बाग फुलवली आहे. शालेय पोषण आहारात याच परसबागेतील भाजी वापरून वेगळा आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे. या परसबागेचा पहिला क्रमांक आला आहे
जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, प्राथमिक शिक्षण अधिकारी आशा उबाळे यांच्या संकल्पनेतून परसबाग प्रकल्प जिल्ह्यातील 67 शाळांत राबविला आहे. मार्च 2019ला बानगे येथे मुख्याध्यापक सुधाकर डिग्रसकर यांना पद्धतीने प्रशिक्षण दिले. लोकवर्गणी ग्रामस्थ, ग्रामपंचायतीच्या सहकार्याने परसबागेचा आराखडा तयार केला. जागा सपाटीकरण, दोन ट्रॉली माती, सुमारे 600 भाजीव विटा, एक ट्रॉली खताची आवश्यकता होती. पहिली ते चौथीपर्यंतच्या 141 विद्यार्थ्यांनी प्रत्येकी एक पाटी खत आणले, वर्तुळाकृती आराखडा तयार केला. जुनमध्ये विद्यार्थी शिक्षक शालेय पोषण आहार करणाऱ्या महिला यांच्या हस्ते भाजीपाला लागवडे केली. जिल्हा परिषदेने 21 प्रकारच्या फळ आणि पालेभाज्यांची "बी' दिले होते. संपूर्ण बागेला स्प्रिंकलरने पाणी दिले. यातून परसबाग फुलली आहे.
शिक्षक प्रफुल्ल कांबळे, प्रदीप कांबळे, उज्वला लोहार, परशुराम देवडकर परिश्रम घेत आहेत. राज्याचे अप्पर शिक्षण सचिव प्रमोद पाटील, जि. प.च्या सहाय्यक वित्त लेखाधिकारी वर्षा परीट, करवीरच्या शालेय पोषण आहार अधिकारी वसुंधरा पाटील, विस्तार अधिकारी भारती कोळी, आमदार ऋतुराज पाटील, माजी आमदार अमल महाडिक,जि. प. सदस्य वंदना पाटील, पंचायत समिती सदस्या शोभा राजमाने, जिल्हा परिषद सदस्य वंदना पाटील, गटशिक्षणाधिकारी एस.के. यादव, केंद्रप्रमुख तुकाराम काटे, सरपंच वैशाली कलकुटगी, उपसरपंच प्रकाश खुडे आदींनी भेट दिली आहे.
आठवड्यातून दोन दिवस 7 किलो भाजी मिळते
पोषण आहारातून मुलांना ताजी भाजी
विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थांनी 10 हजार खर्च
बागेभोवती जाळीचे कंपाउंड
मनुष्यबळ विकास मंत्रालयाने माहिती मागविली
परस बागेची दखल मनुष्यबळ विकास मंत्रालय भारत सरकार यांनी घेतली असून सर्व माहिती मागविली आहे. परसबागेचा उपक्रम सर्वत्र राबविण्याचा त्यांचा मानस आहे. याच बरोबर शाळा ई लर्निंग, डिजिटल वर्ग, हॅन्ड वॉश स्टेशन, खेळणी, सुसज्ज मैदान, के. टी.एस. पहिली दुसरी एम.टी. एस. तिसरी, प्रज्ञाशोध अशा विविध स्पर्धा परिक्षात तालुक्यात यश मिळवले आहे.
सातत्य ठेवणार
गावकरी, सर्व शिक्षक यांच्या सहकार्यातून हे शक्य झाले आहे. भविष्यात नवीन सुधारणा करून सातत्य ठेवणार आहे. यात सर्वप्रथम गावकऱ्यांचे आभार कारण त्यांच्यामुळे हे शक्य झाले आहे.
- सुधाकर डिग्रजकर ः मुख्याध्यापक

from News Story Feeds https://ift.tt/2u8HYEo
No comments:
Post a Comment