पुणे - ‘पूर्वी आणि आताच्या क्रिकेटमध्ये जमीन-आसमानचा फरक आहे. पूर्वी क्रिकेटर्सकडून मिळणारे मार्गदर्शन आम्ही आत्मसात करायचो. नैसर्गिकरीत्या खेळाडू ज्यात यशस्वी होतो, तीच त्याची शैली असायची. परंतु आता फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण अशा प्रत्येक विभागाला प्रशिक्षक असल्याने त्याला वैज्ञानिक स्वरूप आले आहे,’’ असे मत भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार चंदू बोर्डे यांनी व्यक्त केले.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप
महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे ‘मसाप गप्पा’ कार्यक्रमात बोर्डे यांच्याशी परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे यांनी संवाद साधला. कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कोशाध्यक्ष सुनीताराजे पवार, सदानंद मोहोळ आणि रमेश तावडे उपस्थित होते.
बोर्डे म्हणाले, ‘‘एकदिवसीय क्रिकेटमध्ये फलंदाजांची शारीरिक क्षमता पाहून आश्चर्य वाटते. आताचे खेळाडू ज्याप्रकारे मेहनत घेतात तशी मेहनत आम्ही घेतली असती, तर आतापर्यंत क्रिकेट खेळत असतो. अलीकडच्या काळात क्रिकेट हे मनोरंजन झालं असून, अनेक जण कुटुंबासहित क्रिकेट पाहायला जातात. शालेय स्तरावर क्रिकेट खेळताना माझे पहिले शतक झाले. शाळेत असताना रणजीसाठी निवड झाल्याने टप्प्याटप्प्यावर फलंदाजी विकसित करत गेलो. पूर्वी खेळाडूंना क्रिकेट खेळताना वेगवान गोलंदाजांची भीती वाटायची मात्र आताच्या खेळाडूंना ती वाटत नाही. पूर्वी आणि आताच्या गोलंदाजीचा वेग हा समान आहे. पूर्वी वेगवान गोलंदाजांना बाऊंसर टाकण्याचे बंधन नव्हते मात्र आता ते बंधन आहे.’’ लॉर्डसच्या मैदानावर ‘पॅंथर’ म्हणून नाव पडल्याचा किस्सा बोर्डे यांनी या वेळी सांगितला.
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड झाली, याचा आनंद वाटतोय अशी भावना बोर्डे यांनी व्यक्त केली.

from News Story Feeds https://ift.tt/2EhZKqV
No comments:
Post a Comment