Cue3

Sunday, November 3, 2019

केंद्र सरकारची आता महिला फुटबॉल लीग

मुंबई : राष्ट्रीय क्रीडा महासंघांना फारसे महत्त्व न देता होत असलेला खेलो इंडिया प्रकल्प यशस्वी ठरल्यानंतर केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजीजू यांनी केंद्र सरकार महिला फुटबॉल लीग लवकरच सुरू करणार असल्याचे सांगितले.

केंद्र सरकार लवकरच महिला फुटबॉल लीग सुरू करणार आहे. ही लीग कदाचित पुढील महिन्यातही सुरू होईल. या स्पर्धेचे स्वरूप, बोधचिन्ह तयार आहे. ही लीग महिला आणि बालकल्याण मंत्रालयाच्या सहकार्याने घेत आहोत, असे रिजीजू यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत सांगितले. विश्‍वकरंडक 17 वर्षांखालील कुमारी फुटबॉल स्पर्धेच्या बोधचिन्ह अनावरण कार्यक्रमानंतरच्या पत्रकार परिषदेत रिजीजू यांनी ही माहिती दिली.

या स्पर्धेसाठी आम्ही पूर्ण तयार आहोत. या स्पर्धेद्वारे देशात एक फुटबॉलची चळवळच उभी राहील. देशातील फुटबॉलचा स्तर उंचावण्यास या स्पर्धेने मदत होईल. आम्ही याचा जोरदार आक्रमक प्रसार करणार आहोत, हे केल्याशिवाय फुटबॉलमध्ये देशाची प्रगतीच होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

ही लीग प्रत्येक गावात, विभागात होईल. अगदी प्राथमिक स्तरावरून संघ प्रगती करतील. भारतात विश्‍वकरंडक सतरा वर्षांखालील महिला फुटबॉल स्पर्धा होईल, त्याचे वातावरण निर्माण करण्यास ही स्पर्धा नक्कीच मदत करेल. देशातील फुटबॉल संस्कृती वाढायलाच हवी. जगातील सर्वात लोकप्रिय खेळाच्या विश्‍वकरंडक स्पर्धेपासून आपण दूर असणे योग्य नव्हे, असेही त्यांनी सांगितले.

जागतिक क्रमवारी लक्षात घेतल्यास आपल्या महिला संघाचे स्थान पुरुषांपेक्षा वरचे आहे. त्यामुळे त्यांना विश्‍वकरंडक स्पर्धेस पात्र ठरण्याची नक्कीच जास्त संधी आहे. आम्ही त्या दृष्टीनेच प्रयत्न करणार आहोत.
- किरेन रिजीजू, केंद्रीय क्रीडामंत्री.

News Item ID: 
599-news_story-1572793475
Mobile Device Headline: 
केंद्र सरकारची आता महिला फुटबॉल लीग
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

Vertical Image: 
English Headline: 
govt to start women's football league
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
क्रीडा, Sports, सरकार, Government, फुटबॉल, football, मुंबई, Mumbai, मंत्रालय, पत्रकार, विश्‍वकरंडक, World, विभाग, भारत, स्पर्धा, Day
Twitter Publish: 
Meta Description: 
govt to start women's football league राष्ट्रीय क्रीडा महासंघांना फारसे महत्त्व न देता होत असलेला खेलो इंडिया प्रकल्प यशस्वी ठरल्यानंतर केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजीजू यांनी केंद्र सरकार महिला फुटबॉल लीग लवकरच सुरू करणार असल्याचे सांगितले.
Send as Notification: 

from News Story Feeds https://ift.tt/2NGWrgW

No comments:

Post a Comment