Cue3

Wednesday, November 27, 2019

राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतून सुशीलकुमारची माघार

मुंबई : दोनदा ऑलिंपिक ब्राँझपदक जिंकलेल्या सुशीलकुमारने राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतून माघार घेतली आहे. बजरंग पुनियाने आपण ऑलिंपिकची पूर्वतयारी करीत असल्याचे कारण काही दिवसांपूर्वी दिले होते, आता हेच कारण सुशीलकुमारनेही दिले आहे.

बजरंग तसेच सुशीलकुमार हे दोघेही परदेशात सराव करीत आहेत. यात खंड पडू नये यासाठी आपण माघार घेत असल्याचे दोघांनी कळवले असल्याचे भारतीय कुस्ती महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. बजरंगने जागतिक स्पर्धेत ब्राँझ जिंकत ऑलिंपिक पात्रता मिळवली, पण नूर सुलतान येथील स्पर्धेत सुशील अपयशी ठरला होता. या स्पर्धेतून बजरंग, दीपक पुनियानेच ऑलिंपिक पात्रता मिळवली होती. 

दरम्यान, जागतिक ब्राँझपदक विजेती विनेश फोगट, ऑलिंपिक ब्राँझ विजेती साक्षी मलिक या स्पर्धेचे प्रमुख आकर्षण असतील. जालंधरला होणाऱ्या या स्पर्धेत ५०० कुस्तीगीरांचा सहभाग अपेक्षित आहे. या स्पर्धेतील कामगिरी ऑलिंपिक पात्रतेच्या चाचणी स्पर्धांसाठी संघ निवडताना महत्त्वाची ठरणार असल्याने या स्पर्धेला जास्त महत्त्व आहे. 

web title : Sushil Kumar took Retreat from national wrestling

News Item ID: 
599-news_story-1574877804
Mobile Device Headline: 
राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतून सुशीलकुमारची माघार
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

मुंबई : दोनदा ऑलिंपिक ब्राँझपदक जिंकलेल्या सुशीलकुमारने राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतून माघार घेतली आहे. बजरंग पुनियाने आपण ऑलिंपिकची पूर्वतयारी करीत असल्याचे कारण काही दिवसांपूर्वी दिले होते, आता हेच कारण सुशीलकुमारनेही दिले आहे.

बजरंग तसेच सुशीलकुमार हे दोघेही परदेशात सराव करीत आहेत. यात खंड पडू नये यासाठी आपण माघार घेत असल्याचे दोघांनी कळवले असल्याचे भारतीय कुस्ती महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. बजरंगने जागतिक स्पर्धेत ब्राँझ जिंकत ऑलिंपिक पात्रता मिळवली, पण नूर सुलतान येथील स्पर्धेत सुशील अपयशी ठरला होता. या स्पर्धेतून बजरंग, दीपक पुनियानेच ऑलिंपिक पात्रता मिळवली होती. 

दरम्यान, जागतिक ब्राँझपदक विजेती विनेश फोगट, ऑलिंपिक ब्राँझ विजेती साक्षी मलिक या स्पर्धेचे प्रमुख आकर्षण असतील. जालंधरला होणाऱ्या या स्पर्धेत ५०० कुस्तीगीरांचा सहभाग अपेक्षित आहे. या स्पर्धेतील कामगिरी ऑलिंपिक पात्रतेच्या चाचणी स्पर्धांसाठी संघ निवडताना महत्त्वाची ठरणार असल्याने या स्पर्धेला जास्त महत्त्व आहे. 

web title : Sushil Kumar took Retreat from national wrestling

Vertical Image: 
English Headline: 
Sushil Kumar took Retreat from national wrestling
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
ऑलिंपिक, Olympics, कुस्ती, wrestling, मुंबई, Mumbai, बजरंग पुनिया, Bajrang Punia, भारत, विनेश फोगट, Vinesh Phogat, साक्षी मलिक, sushil kumar
Twitter Publish: 
Meta Description: 
Sushil Kumar took Retreat from national wrestling:दोनदा ऑलिंपिक ब्राँझपदक जिंकलेल्या सुशीलकुमारने राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतून माघार घेतली आहे.
Send as Notification: 

from News Story Feeds https://ift.tt/2KYXTuP

No comments:

Post a Comment