पुणे - वजन अति वाढल्यामुळे ‘फिटनेस’ गमावला; परंतु हार न मानता पुन्हा नव्याने व्यायामाला सुरवात केली आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील ‘फिटनेस’चा कस पाहिला जाणाऱ्या ‘ट्रायथलॉन’ शर्यतीत सहभागी होण्याचे स्वप्न पाहिले. त्यासाठी जोमाने प्रयत्न करून ते सत्यातही उतरविले. त्यावरच न थांबत पुढील स्पर्धेत आपलाच विक्रम मोडीत काढत यश मिळविले. मलेशियात दोन वेळा ‘आयर्नमॅन’ किताब पटकाविणाऱ्या प्रसाद शिंदे या तरुणाचा हा प्रवास प्रेरणादायी आहे.
प्रसाद याच्या वजनाने काही वर्षांपूर्वी शंभरी ओलांडली होती. ‘फिटनेस’ मिळविण्यासाठी त्याने व्यायामाला सुरवात केली. त्यातून त्याला व्यायामाची प्रचंड आवड निर्माण झाली. त्यातून त्याने सन २०१५ मध्ये ४२ किलोमीटरची हैदराबाद मॅरेथॉन साडेचार तासांत; तर सन २०१६ मध्ये ४२ किलोमीटरची मुंबई मॅरेथॉन ४ तास १३ मिनिटांमध्ये पूर्ण केली. त्यानंतर त्याने सन २०१६ मध्ये ‘आयर्नमॅन’ किताबासाठी मलेशियात झालेल्या स्पर्धेत सहभाग घेतला. त्याने ती स्पर्धा १४ तास २७ मिनिटांमध्ये पूर्ण करून भारताचा तिरंगा ध्वज अभिमानाने फडकविला. याच स्पर्धेत त्याने यंदा पुन्हा सहभाग घेतला आणि आपला जुना विक्रम मोडीत काढला. त्याने अवघ्या १३ तास १५ मिनिटांत ही स्पर्धा पूर्ण करून दुसऱ्यांदा ‘आयर्नमॅन’ किताब मिळविला. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकास सलग ३.८६ किलोमीटर पोहणे, १८०.२५ किलोमीटर सायकलिंग आणि ४२.१६ किलोमीटर धावणे, अशा तीन प्रकारांतील २२६.२७ किलोमीटर अंतर ठरावीक वेळेत पूर्ण करावे लागते. त्यामध्ये प्रसाद याने निश्चित केलेल्या वेळेपूर्वी (१३ तास १५ मिनिटे) शर्यत पूर्ण करून ‘आयर्नमॅन’ किताब पटकाविला.

from News Story Feeds https://ift.tt/36tPf0n
No comments:
Post a Comment