Cue3

Wednesday, November 20, 2019

AUSvsPAK : कांगारुंनो सावधान! 16 वर्षांचा बछडा आलाय शिकारीला

ब्रिस्बेन : वय वर्षे अवघे 16 गेल्याच महिन्यात आईचे निधन. या वयात एवढा मोठा धक्का बसलेला नसीम शाह हा पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज ऑस्ट्रेलियाशी चार हात करण्यास सज्ज झाला आहे. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आजपासून सुरु झालेल्या कसोटी सामन्यात नसीमने पदार्पण केले आहे. 

INDvsBAN : दोन्ही कसोटी सामन्यांची आकडेवारी वेगळी करावी : गावसकर

Image

पाकिस्तानकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा तो 237वा खेळाडू ठरला आहे. त्याला पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आणि गोलंदाजी प्रशिक्षक वकार युनूसकडून कॅप देण्यात आली. 

पाकिस्तान हा देश वेगवान गोलंदाजांची खाण राहिलेला आहे. एकापेक्षा एक सरस गोलंदाज या देशात तयार झालेले आहेत. नसीम शाह हा त्यांचा नवोदित गोलंदाज. अधिक वेग असलेल्या या गोलंदाजाने पर्थ येथे झालेल्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलिया अ संघाचे आठ विकेट मिळवून त्यांचे कंबरडे मोडले. त्यामुळे पहिल्या कसोटीत त्याची निवड निश्‍चित होती. 

सर्वात लहान वयात पदार्पण करण्याचा विक्रम पाकिस्तानच्याच हसन रझा याच्या नावावर आहे. 1996 मध्ये त्याने कसोटी पदार्पण केले तेव्हा तो 14 वर्षांचा होता.

INDvsBAn : खेळल्याशिवाय आव्हान समजणार नाही : वृद्धीमान साहा

नसीम शाहकडे केवळ वेगच नाही तर वेगावर त्याचे चांगलेच नियंत्रण आहे. पाकिस्तानमधील प्रथम श्रेणी सामन्यांमध्येही त्याने प्रभावशाली कामगिरी केलेली आहे. तो आमच्यासाठी मॅचविनर ठरू शकेल, असा विश्‍वास पाकिस्तान संघाचे मुख्य प्रशिक्षक मिस्बा उल हक यांनी सांगितले. 

आईच्या निधनाने नसीम दुःखी झालेला आहे, पण हे दुःख बाजूला ठेऊन तो नव्या आव्हानासाठी सज्ज होत आहे. कुटूंबाकडूनही त्याला प्रोत्साहन मिळत आहे. तू देशाकडून खेळवेस अशी तुझ्या आईची सुद्धा इच्छा होती, ती पूर्ण करण्याची वेळ आली आहे. अशा प्रकारे पाकिस्तान मंडळाचे सदस्य नसीमला पाठबळ देत आहेत. 

News Item ID: 
599-news_story-1574308143
Mobile Device Headline: 
AUSvsPAK : कांगारुंनो सावधान! 16 वर्षांचा बछडा आलाय शिकारीला
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

ब्रिस्बेन : वय वर्षे अवघे 16 गेल्याच महिन्यात आईचे निधन. या वयात एवढा मोठा धक्का बसलेला नसीम शाह हा पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज ऑस्ट्रेलियाशी चार हात करण्यास सज्ज झाला आहे. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आजपासून सुरु झालेल्या कसोटी सामन्यात नसीमने पदार्पण केले आहे. 

INDvsBAN : दोन्ही कसोटी सामन्यांची आकडेवारी वेगळी करावी : गावसकर

Image

पाकिस्तानकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा तो 237वा खेळाडू ठरला आहे. त्याला पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आणि गोलंदाजी प्रशिक्षक वकार युनूसकडून कॅप देण्यात आली. 

पाकिस्तान हा देश वेगवान गोलंदाजांची खाण राहिलेला आहे. एकापेक्षा एक सरस गोलंदाज या देशात तयार झालेले आहेत. नसीम शाह हा त्यांचा नवोदित गोलंदाज. अधिक वेग असलेल्या या गोलंदाजाने पर्थ येथे झालेल्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलिया अ संघाचे आठ विकेट मिळवून त्यांचे कंबरडे मोडले. त्यामुळे पहिल्या कसोटीत त्याची निवड निश्‍चित होती. 

सर्वात लहान वयात पदार्पण करण्याचा विक्रम पाकिस्तानच्याच हसन रझा याच्या नावावर आहे. 1996 मध्ये त्याने कसोटी पदार्पण केले तेव्हा तो 14 वर्षांचा होता.

INDvsBAn : खेळल्याशिवाय आव्हान समजणार नाही : वृद्धीमान साहा

नसीम शाहकडे केवळ वेगच नाही तर वेगावर त्याचे चांगलेच नियंत्रण आहे. पाकिस्तानमधील प्रथम श्रेणी सामन्यांमध्येही त्याने प्रभावशाली कामगिरी केलेली आहे. तो आमच्यासाठी मॅचविनर ठरू शकेल, असा विश्‍वास पाकिस्तान संघाचे मुख्य प्रशिक्षक मिस्बा उल हक यांनी सांगितले. 

आईच्या निधनाने नसीम दुःखी झालेला आहे, पण हे दुःख बाजूला ठेऊन तो नव्या आव्हानासाठी सज्ज होत आहे. कुटूंबाकडूनही त्याला प्रोत्साहन मिळत आहे. तू देशाकडून खेळवेस अशी तुझ्या आईची सुद्धा इच्छा होती, ती पूर्ण करण्याची वेळ आली आहे. अशा प्रकारे पाकिस्तान मंडळाचे सदस्य नसीमला पाठबळ देत आहेत. 

Vertical Image: 
English Headline: 
Naseem Shah made his test debut for Pakistan against Australia
वृत्तसंस्था
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, कसोटी, Test, गोलंदाजी, bowling, विकेट, wickets, cricket, twitter, play, मिस्बा उल हक, नासा
Twitter Publish: 
Meta Description: 
Naseem Shah made his test debut for Pakistan against Australia :वय वर्षे अवघे 16 गेल्याच महिन्यात आईचे निधन. या वयात एवढा मोठा धक्का बसलेला नसीम शाह हा पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज ऑस्ट्रेलियाशी चार हात करण्यास सज्ज झाला आहे. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आजपासून सुरु झालेल्या कसोटी सामन्यात नसीमने पदार्पण केले आहे. 
Send as Notification: 

from News Story Feeds https://ift.tt/2O71icY

No comments:

Post a Comment