नवी दिल्ली : भारताचे माजी कर्णधार आणि नव्याने नियुक्ती झालेले बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतीली भविष्यावर मोठे भाष्य केले आहे. 24 ऑक्टोबरला निवड समितीशी बैठक झाल्यानंतर धोनीबद्दल निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्याने स्पष्ट केले.
अखेर धोनी मीडियाशी बोलला; म्हणाला...
''धोनीच्या भविष्याबद्दल काय निर्णय घ्यायचा हे 24 तारखेला निवड समितीच्या बैठकीनंतर ठरेल. निवड समितीचे सदस्य त्याच्याबद्दल काय विचार करतात हे पाहिल्यावर मी माझे मत देईन. धोनीला स्वत:ला काय हवे हेही आपल्याला पाहायला हवे. मी स्वत: त्याच्याशी बोलेन, त्याला नक्की काय करायचे काय करायचे नाही याबाबत चर्चा झाल्यावर त्याच्या भविष्यावर निर्णय होईल,'' असे गांगुलीने सांगितले.

धोनीच्या अनुपस्थितीत संघ व्यवस्थापन रिषभ पंतला एकदिवसीय संघात स्थान दिले जाते. मात्र, संघाला धोनीच्या निर्णयाची गरज आहे. कारण धोनी जर ट्वेंटी20 विश्वकरंडकात खेळणार असले तर त्याचा बॅकअप म्हणून फक्त पंतला संधी देण्यात येईल. मात्र, जर धोनी खेळणार नसेल तर पंत सोबत संजू सॅमसन किंवा ईशान किशनलाही संधी मिळू शकते.
तुम्हाला माहितीये का सुपर ओव्हरचा नवा नियम सचिननेच सर्वप्रथम सुचवालाय
इंग्लंडमधील विश्वकरंडकानंतर धोनीने क्रिकेटमधून दोन महिन्यांचा ब्रेक घेतला होता. त्यानंतर त्याने आता तो ब्रेक वाढवून घेतला आहे. त्यामुळेच 24 तारखेला धोनीवर निर्य घेतला जाईल असे गांगुलीने स्पष्ट केले आहे. 3 नोव्हेंबरपासून बांगलादेशचा भारत दौरा सुरु होत आहे. यासाठी 24 तारखेला संघनिवड केली जाणार आहे. या दौऱ्यात ट्वेंटी20 आणि कसोटी मालिका खेळविल्या जाणार आहेत.

from News Story Feeds https://ift.tt/33uRP3Y
No comments:
Post a Comment