Cue3

Sunday, October 27, 2019

कुस्तीगीर श्रवणकडून जागतिक धमाका अपेक्षित

मुंबई : आशियाई विजेता श्रवण भारताच्या जागतिक युवा (23 वर्षांखालील) कुस्ती स्पर्धेतील भारताच्या मोहिमेस जोरदार सुरुवात करेल, अशी अपेक्षा बाळगली जात आहे. गतस्पर्धेतील एका पदकापेक्षा खूपच सरस कामगिरी करण्याची आशा भारतीय संघ बाळगून आहे.

बुडापेस्टला (हंगेरी) येथे आजपासून होणारी ही स्पर्धा 3 नोव्हेंबरपर्यंत होणार आहे. भारतीय सरस असलेल्या फ्रीस्टाईल गटाद्वारे ही स्पर्धा सुरू होईल. पहिल्या दिवशी श्रवणसह (65 किलो), नवीन (57 किलो), विरदेव गुलिया (79 किलो), आकाश अंतिल (97 किलो) मॅटवर उतरतील. गतस्पर्धेत रवीकुमार दहियाने 57 किलो गटात रौप्यपदक जिंकले होते.

भारतास ग्रीको रोमनमध्येही चांगल्या आशा आहेत. साजन भनवाल याने जागतिक कुमार स्पर्धेच्या 77 किलो गटात तीन पदके जिंकली आहेत. तो प्रथमच युवा स्पर्धेत खेळणार आहे. त्याचबरोबर पिंकी आणि रेश्‍मा मानेही प्रभावी कामगिरी करतील अशी आशा आहे. सोनिपत आणि लखनौ येथे संघाचे पंधरा दिवसांचे कसून शिबिर झाले होते, त्याचा फायदा होईल, अशी अपेक्षा बाळगली जात आहे.

या स्पर्धेत 60 देशातील 600 कुस्तीगीरांचा सहभाग आहे. त्यात पहिले दोन दिवस फ्रीस्टाईल, त्यानंतर महिलांची आणि ग्रीको रोमनची तीन दिवस स्पर्धा होईल. या स्पर्धेचे रेसलिंगटीव्ही डॉट इन या संकेतस्थळावर थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

News Item ID: 
599-news_story-1572197608
Mobile Device Headline: 
कुस्तीगीर श्रवणकडून जागतिक धमाका अपेक्षित
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

मुंबई : आशियाई विजेता श्रवण भारताच्या जागतिक युवा (23 वर्षांखालील) कुस्ती स्पर्धेतील भारताच्या मोहिमेस जोरदार सुरुवात करेल, अशी अपेक्षा बाळगली जात आहे. गतस्पर्धेतील एका पदकापेक्षा खूपच सरस कामगिरी करण्याची आशा भारतीय संघ बाळगून आहे.

बुडापेस्टला (हंगेरी) येथे आजपासून होणारी ही स्पर्धा 3 नोव्हेंबरपर्यंत होणार आहे. भारतीय सरस असलेल्या फ्रीस्टाईल गटाद्वारे ही स्पर्धा सुरू होईल. पहिल्या दिवशी श्रवणसह (65 किलो), नवीन (57 किलो), विरदेव गुलिया (79 किलो), आकाश अंतिल (97 किलो) मॅटवर उतरतील. गतस्पर्धेत रवीकुमार दहियाने 57 किलो गटात रौप्यपदक जिंकले होते.

भारतास ग्रीको रोमनमध्येही चांगल्या आशा आहेत. साजन भनवाल याने जागतिक कुमार स्पर्धेच्या 77 किलो गटात तीन पदके जिंकली आहेत. तो प्रथमच युवा स्पर्धेत खेळणार आहे. त्याचबरोबर पिंकी आणि रेश्‍मा मानेही प्रभावी कामगिरी करतील अशी आशा आहे. सोनिपत आणि लखनौ येथे संघाचे पंधरा दिवसांचे कसून शिबिर झाले होते, त्याचा फायदा होईल, अशी अपेक्षा बाळगली जात आहे.

या स्पर्धेत 60 देशातील 600 कुस्तीगीरांचा सहभाग आहे. त्यात पहिले दोन दिवस फ्रीस्टाईल, त्यानंतर महिलांची आणि ग्रीको रोमनची तीन दिवस स्पर्धा होईल. या स्पर्धेचे रेसलिंगटीव्ही डॉट इन या संकेतस्थळावर थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

Vertical Image: 
English Headline: 
india hope to improve medal tally in world under 23 wrestling
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
भारत, कुस्ती, wrestling, स्पर्धा, Day, महिला, women
Twitter Publish: 
Meta Description: 
आशियाई विजेता श्रवण भारताच्या जागतिक युवा (23 वर्षांखालील) कुस्ती स्पर्धेतील भारताच्या मोहिमेस जोरदार सुरुवात करेल, अशी अपेक्षा बाळगली जात आहे. गतस्पर्धेतील एका पदकापेक्षा खूपच सरस कामगिरी करण्याची आशा भारतीय संघ बाळगून आहे.
Send as Notification: 

from News Story Feeds https://ift.tt/2WgwvNe

No comments:

Post a Comment