Cue3

Friday, September 13, 2019

बॉक्सर मनीष, दुर्योधनचा सलामीला विजय

मुंबई : राष्ट्रकुल क्रीडा उपविजेता मनीष कौशिक, तसेच दुर्योधन सिंग नेगी यांनी जागतिक बॉक्‍सिंग स्पर्धेतील भारताची विजयी मालिका कायम राखली. दोघांनाही स्पर्धेतील त्यांच्या सलामीच्या लढतीत विजयासाठी फारसे प्रयास पडले नाहीत.

रशियात सुरु असलेल्या या स्पर्धेत दुर्योधनने आर्मेनियाच्या कोर्युन ऍस्तोयान याचे आव्हान 4-1 असे सहज परतवले. दुर्योधनचा प्रतिस्पर्धी चांगलाच बलदंड होता, त्यामुळे दुर्योधन सुरुवातीस काहीसा धास्तावलेला होता, पण काही वेळातच आपला प्रतिहल्ला यशस्वी होत असल्याचे त्याच्या लक्षात आले. दुर्योधनच्या ठोशात पुरेशी अचूकता नव्हती, तरीही त्याने प्रतिस्पर्ध्यास थकवले.

ऍस्तोयानचा बचाव कमकुवत असल्याचा फायदा दुर्योधनला झाला. यावर मात करण्यासाठी ठोशाचा प्रयत्न केल्यावर दुर्योधनपासून तो दूर जाण्याचा प्रयत्न करीत होता, त्यामुळे तो जास्त थकला. परिणामी अखेरच्या फेरीत आपणच सरस असल्याचे दुर्योधनने सहज दाखवले.

मनीष कौशिकने किर्गिजस्तानच्या उलु आग्रेन काद्रिबेक याचा 5-0 असा सहज पाडाव केला. प्रतिस्पर्ध्यापासून सुरक्षित अंतर ठेवत मनीषने हल्ला केला आणि पंचांना आपल्याच बाजूने निकाल देण्यास भाग पाडले. पहिल्या फेरीत मनीषने प्रतिस्पर्ध्याचा अभ्यास केला. त्यानंतर हुक आणि ताकदवान पंचचा वापर केला. त्याचा प्रतिस्पर्धी तुलनेत खूपच संथ होता. त्यामुळे मनीषला क्वचितच घाम गाळावा लागला.

News Item ID: 
599-news_story-1568395214
Mobile Device Headline: 
बॉक्सर मनीष, दुर्योधनचा सलामीला विजय
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

मुंबई : राष्ट्रकुल क्रीडा उपविजेता मनीष कौशिक, तसेच दुर्योधन सिंग नेगी यांनी जागतिक बॉक्‍सिंग स्पर्धेतील भारताची विजयी मालिका कायम राखली. दोघांनाही स्पर्धेतील त्यांच्या सलामीच्या लढतीत विजयासाठी फारसे प्रयास पडले नाहीत.

रशियात सुरु असलेल्या या स्पर्धेत दुर्योधनने आर्मेनियाच्या कोर्युन ऍस्तोयान याचे आव्हान 4-1 असे सहज परतवले. दुर्योधनचा प्रतिस्पर्धी चांगलाच बलदंड होता, त्यामुळे दुर्योधन सुरुवातीस काहीसा धास्तावलेला होता, पण काही वेळातच आपला प्रतिहल्ला यशस्वी होत असल्याचे त्याच्या लक्षात आले. दुर्योधनच्या ठोशात पुरेशी अचूकता नव्हती, तरीही त्याने प्रतिस्पर्ध्यास थकवले.

ऍस्तोयानचा बचाव कमकुवत असल्याचा फायदा दुर्योधनला झाला. यावर मात करण्यासाठी ठोशाचा प्रयत्न केल्यावर दुर्योधनपासून तो दूर जाण्याचा प्रयत्न करीत होता, त्यामुळे तो जास्त थकला. परिणामी अखेरच्या फेरीत आपणच सरस असल्याचे दुर्योधनने सहज दाखवले.

मनीष कौशिकने किर्गिजस्तानच्या उलु आग्रेन काद्रिबेक याचा 5-0 असा सहज पाडाव केला. प्रतिस्पर्ध्यापासून सुरक्षित अंतर ठेवत मनीषने हल्ला केला आणि पंचांना आपल्याच बाजूने निकाल देण्यास भाग पाडले. पहिल्या फेरीत मनीषने प्रतिस्पर्ध्याचा अभ्यास केला. त्यानंतर हुक आणि ताकदवान पंचचा वापर केला. त्याचा प्रतिस्पर्धी तुलनेत खूपच संथ होता. त्यामुळे मनीषला क्वचितच घाम गाळावा लागला.

Vertical Image: 
English Headline: 
boxer Manish, Duryodhan won opening bouts in world championship
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
भारत
Twitter Publish: 
Meta Description: 
राष्ट्रकुल क्रीडा उपविजेता मनीष कौशिक, तसेच दुर्योधन सिंग नेगी यांनी जागतिक बॉक्‍सिंग स्पर्धेतील भारताची विजयी मालिका कायम राखली. दोघांनाही स्पर्धेतील त्यांच्या सलामीच्या लढतीत विजयासाठी फारसे प्रयास पडले नाहीत.
Send as Notification: 

from News Story Feeds https://ift.tt/31lb67p

No comments:

Post a Comment