ढाका : अफगाणिस्तान क्रिकेट संघ सध्या सुसाट सुटला आहे. पहिल्या वहिल्या कसोटी विजयानंतर त्यांनी आता ट्वेंटी20 तिरंगी मालिकेतही विजयी धडाका कायम राखला आहे. रविवारी झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानने यजमान बांगलादेशवर 25 धावांनी विजय मिळवला. याच विजयासह त्यांनी स्वत:चाच एक अनोखा विक्रम मोडत नव्याने वर्ल्ड रेकॉर्ड रचला आहे.
रिषभ पंतने विंडीजमध्ये संघाची लाज घालवली : रवी शास्त्री
अफगाणिस्तान, झिम्बाब्वे आणि बांगलादेश यांच्यात सुरु असलेल्या तिरंगी मालिकेत त्यांनी सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली आहे. याचसह त्यांनी ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये सलग 12 विजय मिळविण्याच्या विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. आयसीसी क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेला आपला भारतीय संघ, एवढेच काय तर पहिल्या क्रमांकावर असलेला पाकिस्तानचा संघही या विक्रमाच्या आसपासही नाही.
आता यांना रोखणे अवघड! सात चेंडूत ठोकले सात षटकार
Afghanistan have broken their own record of the longest winning streak in Men's T20I cricket pic.twitter.com/k4kX20Y3VG
— ICC (@ICC) September 16, 2019
अफगाणिस्तानने बांगलादेशविरुद्ध झालेला सामना 25 धावांनी जिंकला आणि या विजयासह अफगाणिस्तानने सलग 12 ट्वेंटी20 सामने जिंकण्याचा पराक्रम केला. त्यांनी स्वतःच्याच नावावर असलेला 11 विजयांचा विश्वविक्रम मोडला.
Afghanistan win by 25 runs!
They have now won 12 consecutive T20Is, beating their own record in men's cricket!
Four wickets for Mujeeb and an unbeaten 84 from Mohammad Nabi proved too much for Bangladesh.#BANvAFG pic.twitter.com/9X04fdVWuQ
— ICC (@ICC) September 15, 2019
अफगाणिस्तानने आशियात खेळलेले मागील सर्व 21 सामने जिंकले आहेत. सलग सर्वाधिक ट्वेंटी20 विजय मिळवणाऱ्या अव्वल पाच संघांत अफगाणिस्तान (12), अफगाणिस्तान (11), पाकिस्तान (9), इंग्लंड (8), आयर्लंड (8) आणि पाकिस्तान (8) यांचा क्रमांक येतो.

from News Story Feeds https://ift.tt/2UYa5j8
No comments:
Post a Comment