मुंबई : भारताचे ज्येष्ठ कसोटीपटू माधव आपटे (86) यांचे मुंबईत सोमवारी पहाटे निधन झाले.
5 ऑक्टोबर 1932 रोजी त्यांचा जन्म झाला. ते उजव्या हाताने फलंदाजी करत आणि उजव्या हाताने गोलंदाजी करीत. त्यांची प्रथम श्रेणी कारकीर्द प्रदीर्घ होती. 67 सामन्यात 49.27 अशा उत्तम सरासरीने त्यांनी 3336 धावा केल्या. यामध्ये सहा शतके आणि 16 अर्धशतके समाविष्ट आहेत. त्यांची सर्वोच्च धावसंख्या 165 होती.
कसोटीमध्ये मात्र त्यांना केवळ सात सामन्यात संधी मिळाली एक शतक आणि तीन अर्धशतक यांसह त्यांनी 542 धावा केल्या. त्यांनी मुंबई आणि बंगाल या संघांचे प्रतिनिधित्व केले.
1952 ते 1953 अशा एकाच वर्षाच्या कारकिर्दीत त्यांना संधी मिळाली. मात्र त्या कालावधीत त्यांनी ठसा उमटवला. ते क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय) आणि अलीकडेच स्थापन झालेल्या लीजंड्स क्लबचे अध्यक्ष होते. त्यांचे बंधू अरविंद हेसुद्धा क्रिकेटपटू होत.
विनू मंकड यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी क्रिकेटचा श्रीगणेशा केला. उद्योजक म्हणूनही त्यांची ख्याती होती.

from News Story Feeds https://ift.tt/2NrV7Rq
No comments:
Post a Comment