Cue3

Saturday, September 7, 2019

अमेरिकन टेनिस : 38 वर्षांच्या सेरेनाविरुद्ध 19 वर्षांची बियांका सरस

न्यूयॉर्क : अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या फायनलमध्ये 38 वर्षांच्या सेरेना विल्यम्सला कॅनडाची 19 वर्षांची बियांका आंद्रीस्क्यू भारी पडली.

बियांकाने दोन सेटमध्येच 6-3, 7-5 असा विजय मिळविला. दुसऱ्या सेटमध्ये 1-5 अशा पिछाडीवरून सेरेनाने सलग चार गेम जिंकले. त्यावेळी तिने आशा पल्लवित केल्या होत्या.

मात्र 11व्या गेममध्ये काही फटके चुकल्यानंतरही बियांकाने सर्व्हिस राखली. त्यानंतर सेरेनाने एक बिनतोड सर्व्हिस करत एक चॅम्पियनशिप पॉईंट वाचवला, पण बियांकाने ऐतिहासिक सुवर्णसंधी निसटू दिली नाही.

या पराभवामुळे सेरेनाची विश्वविक्रमाची बरोबरी करण्याची प्रतीक्षा लांबली आहे. ऑस्ट्रेलियाच्या मार्गारेट कोर्ट यांचा 24 ग्रॅंड स्लॅम विजेतेपदांचा उच्चांक आहे. सेरेना त्यापासून एकच करंडक दूर आहे.

सेरेनाला गेल्या दोन मोसमांत विम्बल्डन आणि अमेरिकन या स्पर्धांच्या फायनलमध्ये पराभूत व्हावे लागले आहे. विम्बल्डनला गतवर्षी जर्मनीची अँजेलीक केर्बर आणि यंदा रुमानियाची सिमोना हलेप, तर मायदेशातील ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत गतवर्षी जपानची नाओमी ओसाका यांच्याविरुद्ध ती पराभूत झाली.

News Item ID: 
599-news_story-1567909948
Mobile Device Headline: 
अमेरिकन टेनिस : 38 वर्षांच्या सेरेनाविरुद्ध 19 वर्षांची बियांका सरस
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

न्यूयॉर्क : अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या फायनलमध्ये 38 वर्षांच्या सेरेना विल्यम्सला कॅनडाची 19 वर्षांची बियांका आंद्रीस्क्यू भारी पडली.

बियांकाने दोन सेटमध्येच 6-3, 7-5 असा विजय मिळविला. दुसऱ्या सेटमध्ये 1-5 अशा पिछाडीवरून सेरेनाने सलग चार गेम जिंकले. त्यावेळी तिने आशा पल्लवित केल्या होत्या.

मात्र 11व्या गेममध्ये काही फटके चुकल्यानंतरही बियांकाने सर्व्हिस राखली. त्यानंतर सेरेनाने एक बिनतोड सर्व्हिस करत एक चॅम्पियनशिप पॉईंट वाचवला, पण बियांकाने ऐतिहासिक सुवर्णसंधी निसटू दिली नाही.

या पराभवामुळे सेरेनाची विश्वविक्रमाची बरोबरी करण्याची प्रतीक्षा लांबली आहे. ऑस्ट्रेलियाच्या मार्गारेट कोर्ट यांचा 24 ग्रॅंड स्लॅम विजेतेपदांचा उच्चांक आहे. सेरेना त्यापासून एकच करंडक दूर आहे.

सेरेनाला गेल्या दोन मोसमांत विम्बल्डन आणि अमेरिकन या स्पर्धांच्या फायनलमध्ये पराभूत व्हावे लागले आहे. विम्बल्डनला गतवर्षी जर्मनीची अँजेलीक केर्बर आणि यंदा रुमानियाची सिमोना हलेप, तर मायदेशातील ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत गतवर्षी जपानची नाओमी ओसाका यांच्याविरुद्ध ती पराभूत झाली.

Vertical Image: 
English Headline: 
Bianca Andreescu beats Serena Williams to win her first US Open title
Author Type: 
External Author
वृत्तसंस्था
Search Functional Tags: 
न्यूयॉर्क, अमेरिकन ओपन, US Open, अमेरिकन ओपन टेनिस, टेनिस
Twitter Publish: 
Meta Description: 
अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या फायनलमध्ये 38 वर्षांच्या सेरेना विल्यम्सला कॅनडाची 19 वर्षांची बियांका आंद्रीस्क्यू भारी पडली.
Send as Notification: 

from News Story Feeds https://ift.tt/34xHiX6

No comments:

Post a Comment