दुबई - ऍशेस मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात दोन्ही डावांत शतकी खेळी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथने कसोटी क्रमवारीत फलंदाजांमध्ये तिसरे स्थान मिळविले आहे. त्याने भारताच्या चेतेश्वर पुजाराला मागे टाकले.
पुजारा चौथ्या स्थानावर आला आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीचे अव्वल स्थान आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनचे दुसरे स्थान कायम राहिले आहे. गोलंदाजीत ऑस्ट्रेलियाचाच पॅट कमिन्स अव्वल स्थानावर कायम राहिला आहे. फिरकी गोलंदाज नॅथन लायन सहा स्थानांची झेप घेऊन तेराव्या स्थानावर आला आहे. इंग्लंडचा स्टुअर्ट ब्रॉड 16व्या स्थानावर आला आहे.

from News Story Feeds https://ift.tt/2OFzDC7
No comments:
Post a Comment