नवी दिल्ली - ऑलिंपिक सुवर्णपदकाची अपेक्षा बाळगणे सोपे असले, तरी ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवणे तेवढे सोपे नाही. आव्हाने अधिक असतात, असे मत भारताची सहा वेळची जगज्जेती बॉक्सिंग खेळाडू मेरी कोम हिने व्यक्त केले आहे.
ऑलिंपिक सुवर्णपदकाचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी आपण शक्य ते प्रयत्न करू असे सांगून मेरी म्हणाली, ""आगामी ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवावे अशी देशवासीयांची अपेक्षा आहे. माझ्याकडून ही अपेक्षा बाळगली जावी ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. ते मिळविण्यासाठी किंवा चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण सर्वस्व पणाला लावू. पण, अपेक्षा बाळगणे जेवढे सोपे आहे, तेवढे ती प्रत्यक्षात उतरवणे सोपे नाही.''
सुवर्णपदकाची अपेक्षा मलादेखील आहे. पण, मी घाई करणार नाही. टप्प्याटप्प्याने मी उद्दिष्टापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी आधी मला ऑलिंपिकमध्ये पात्र ठरणे आवश्यक आहे, असे तीने सांगितले. ती म्हणाली, ""ऑलिंपिकमध्ये पात्र ठरणे हे सर्वांत महत्त्वाचे आहे. एकदा का मी पात्र ठरले, की मी त्यापेक्षा अधिक चांगली कामगिरी करेन आणि तेव्हाच चाहत्यांचा माझ्याकडून काय अपेक्षा आहेत याचा विचार करेन.''
मेरीने गेल्याच आठवड्यात प्रेसिडेंट करंडक बॉक्सिंग स्पर्धेत 51 गटात विजेतेपद मिळविले आहे. ती म्हणाली, ""मोसमाची सुरवात चांगली झाली आहे. सराव चांगला होत आहे आणि स्पर्धात्मक अनुभवही मिळत आहे. त्यामुळे जागतिक स्पर्धेत खेळताना दडपणाचा भार काहीसा हलका होईल.''
वजन गट बदलल्याचा माझ्यावर फारसा फरक पडलेला नाही. स्पर्धेतील 48 आणि 51 किलो वजनी गटात फारसा फरक नाही. आता 51 किलो वजनी गटाचाही मला पुरेसा अनुभव मिळाला आहे. या वजनी गटातील आव्हानांना सामोरे जाताना वेगळ्या पद्धतीने तयारी करत आहे.
- मेरी कोम, भारताची आघाडीची बॉक्सिंग खेळाडू

from News Story Feeds https://ift.tt/2YALGVa
No comments:
Post a Comment