Cue3

Saturday, July 20, 2019

आता टी-20 विश्वकरंडकावर लक्ष; विंडीजसाठी नवोदितांना संधी अपेक्षित 

मुंबई : महेंद्रसिंह धोनीची वेस्ट इंडीज दौऱ्यातून माघार, तसेच विराट कोहलीने निवड समिती बैठकीस उपस्थित राहण्यास दाखवलेला हिरवा कंदील, या पार्श्वभूमीवर संघनिवडीची बैठक होईल. त्यात कोलमडत्या मधल्या फळीस स्थैर्य देण्याचा प्रयत्न होईल. त्यामुळे विंडीज दौऱ्यात नवोदित फलंदाजांना संधी मिळण्याची शक्‍यता आहे. 

धोनीच्या माघारीमुळे यष्टिरक्षक म्हणून रिषभ पंतची निवड जवळपास निश्‍चित आहे. त्याच्या साथीला वृद्धिमान साहाची निवड होण्याची शक्‍यता आहे. विश्वकरंडक ट्‌वेंटी 20 स्पर्धा पुढील वर्षी जानेवारीत होणार आहे. त्या दृष्टीने संघ उभारणी करणे, हे निवड समितीचे लक्ष्य असेल. त्यामुळेच जवळपास एक वर्ष संघाबाहेर असलेल्या साहाला मर्यादित षटकांच्या लढतीसाठीही निवडले जाणार का, याबाबत औत्सुक्‍य आहे; मात्र आता संघाला सतावत असलेली मधली फळी भक्कम करण्याकडे लक्ष दिले जाण्याची शक्‍यता आहे. 

मार्गदर्शक रवी शास्त्री यांनी विश्वकरंडक स्पर्धेत मधल्या फळीत भक्कम फलंदाज नसल्याचा फटका बसला असल्याचे सांगितले. आता विजय शंकर तसेच शिखर धवन हे दुखापतीमुळे विश्वकरंडक स्पर्धा सोडून परतले होते. ते अद्याप पूर्ण तंदुरुस्त नसल्याचे समजते. या परिस्थितीत भारतीय संघातील स्थानासाठी भारत अ कर्णधार मनीष पांडे, श्रेयस अय्यर, शुभमन गिल यांचा विचार होऊ शकेल. 

सलामीवीर रोहित शर्मा ब्रेक घेण्याची शक्‍यता आहे. या परिस्थितीत के. एल. राहुल आणि मयांक अगरवाल यांना सलामीस पसंती दिली जाण्याची शक्‍यता आहे. पृथ्वी शॉ तंदुरुस्त असल्यास त्याचा कसोटीसाठी विचार होऊ शकेल. त्याचबरोबर गुजरातचा प्रियांक पांचाळ आणि बंगालचा अभिमन्यू ईश्वरन हेही चर्चेत असतील. 

गोलंदाजांबाबत बोलायचे तर जसप्रीत बुमरा आणि महम्मद शमी यांना ब्रेक दिला जाणार असल्याची चर्चा आहे. आयपीएलपाठोपाठ अ दौऱ्यात यशस्वी होत असलेला खलील अहमद, दिल्लीचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनी हे स्पर्धेत असतील. त्यांची भारतीय संघाचे सराव गोलंदाज म्हणूनही निवड झाली होती. 

News Item ID: 
599-news_story-1563676955
Mobile Device Headline: 
आता टी-20 विश्वकरंडकावर लक्ष; विंडीजसाठी नवोदितांना संधी अपेक्षित 
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

Vertical Image: 
English Headline: 
Indian cricket team selection for west indies tour
Author Type: 
External Author
वृत्तसंस्था
Search Functional Tags: 
विजय शंकर, Vijay Shankar, शिखर धवन, Shikhar Dhawan, भारत, शुभमन गिल, Shubhman Gill, वेस्ट इंडीज, रोहित शर्मा, Rohit Sharma, के. एल. राहुल, मयांक अगरवाल
Twitter Publish: 
Meta Description: 
महेंद्रसिंह धोनीची वेस्ट इंडीज दौऱ्यातून माघार, तसेच विराट कोहलीने निवड समिती बैठकीस उपस्थित राहण्यास दाखवलेला हिरवा कंदील, या पार्श्वभूमीवर संघनिवडीची बैठक होईल. त्यात कोलमडत्या मधल्या फळीस स्थैर्य देण्याचा प्रयत्न होईल. त्यामुळे विंडीज दौऱ्यात नवोदित फलंदाजांना संधी मिळण्याची शक्‍यता आहे.
Send as Notification: 

from News Story Feeds https://ift.tt/32HndN9

No comments:

Post a Comment