Cue3

Saturday, June 15, 2019

पाकिस्तानी बशीर चाचा म्हणतात, भारतच जिंकणार (व्हिडिओ)

मँचेस्टर : भारत आणि पाकिस्तान यांच्यात होत असलेल्या हायव्होल्टेज सामन्यात भारतच एकतर्फी विजय मिळवेल असा अंदाज कराचीत जन्मलेले आणि न्यूयॉर्कमध्ये व्यवसायासाठी स्थायिक झालेले महंमद बशीर यांनी व्यक्त केला आहे. बशीर चाचा अशीही त्यांची ओळख आहे. 

भारत, पाकिस्तान संघांच्या चाहत्यांची कमी नाही. या दोन्ही संघांचे एकेक चाहते असे आहेत, की त्यांचा खर्च थेट खेळाडूच करतात. पण, कराचीत जन्मलेले आणि न्यूयॉर्कमध्ये व्यवसायासाठी स्थायिक झालेले महंमद बशीर या दोन्ही संघांचे चाहते आहेत. ते 'चाचा शिकागो' म्हणून ओळखले जातात. भारत- पाकिस्तान यांच्या 2011मध्ये झालेल्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य सामन्यापासून भारत- पाकिस्तान सामना आणि चाचा शिकागो हे नाते दृढ झाले आहे. विशेष म्हणजे तेव्हापासून 'चाचा शिकागो' यांना सामन्याचे तिकीट महेंद्रसिंह धोनीकडून मिळते. 

यंदाच्या विश्‍वकरंडक स्पर्धेसाठीदेखील ते मँचेस्टरला दाखल झाले आहेत. या सामन्याच्या तिकिटांचा काळ्या बाजारातील भाव बघून चाहत्यांचे डोळे पांढरे होत आहेत, तरी तिकीट खरेदी करणारे असंख्य चाहते आहेत. चाचा शिकागो म्हणतात अमेरिकेला शिकागो येथे परत जाण्याचा माझा खर्च इतका आहे; पण धोनी आपल्याला तिकीट देणार याची खात्री त्यांना आहे. धोनीशी संपर्क झाला नाही. मात्र, संदेश दिला असून, त्या तिकिटाची खात्री दिली आहे. मोहालीत 2011 मध्ये माझ्यासाठी त्यांनी जे केले ते कधीच विसरणार नाही. धोनी सर्वोत्तम खेळाडूप्रमाणे एक चांगला माणूसही आहे, असे चाचा शिकागो म्हणाले. ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमबाहेर शनिवारी महंमद बशीर यांनी भारतीय क्रिकेटप्रेमी सुधीर गौतम याला कडकडून मिठी मारली. तसेच त्यांनी ये दोस्ती हम नही छोडेंगे हे गाणेही म्हटले.

News Item ID: 
599-news_story-1560651854
Mobile Device Headline: 
पाकिस्तानी बशीर चाचा म्हणतात, भारतच जिंकणार (व्हिडिओ)
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

मँचेस्टर : भारत आणि पाकिस्तान यांच्यात होत असलेल्या हायव्होल्टेज सामन्यात भारतच एकतर्फी विजय मिळवेल असा अंदाज कराचीत जन्मलेले आणि न्यूयॉर्कमध्ये व्यवसायासाठी स्थायिक झालेले महंमद बशीर यांनी व्यक्त केला आहे. बशीर चाचा अशीही त्यांची ओळख आहे. 

भारत, पाकिस्तान संघांच्या चाहत्यांची कमी नाही. या दोन्ही संघांचे एकेक चाहते असे आहेत, की त्यांचा खर्च थेट खेळाडूच करतात. पण, कराचीत जन्मलेले आणि न्यूयॉर्कमध्ये व्यवसायासाठी स्थायिक झालेले महंमद बशीर या दोन्ही संघांचे चाहते आहेत. ते 'चाचा शिकागो' म्हणून ओळखले जातात. भारत- पाकिस्तान यांच्या 2011मध्ये झालेल्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य सामन्यापासून भारत- पाकिस्तान सामना आणि चाचा शिकागो हे नाते दृढ झाले आहे. विशेष म्हणजे तेव्हापासून 'चाचा शिकागो' यांना सामन्याचे तिकीट महेंद्रसिंह धोनीकडून मिळते. 

यंदाच्या विश्‍वकरंडक स्पर्धेसाठीदेखील ते मँचेस्टरला दाखल झाले आहेत. या सामन्याच्या तिकिटांचा काळ्या बाजारातील भाव बघून चाहत्यांचे डोळे पांढरे होत आहेत, तरी तिकीट खरेदी करणारे असंख्य चाहते आहेत. चाचा शिकागो म्हणतात अमेरिकेला शिकागो येथे परत जाण्याचा माझा खर्च इतका आहे; पण धोनी आपल्याला तिकीट देणार याची खात्री त्यांना आहे. धोनीशी संपर्क झाला नाही. मात्र, संदेश दिला असून, त्या तिकिटाची खात्री दिली आहे. मोहालीत 2011 मध्ये माझ्यासाठी त्यांनी जे केले ते कधीच विसरणार नाही. धोनी सर्वोत्तम खेळाडूप्रमाणे एक चांगला माणूसही आहे, असे चाचा शिकागो म्हणाले. ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमबाहेर शनिवारी महंमद बशीर यांनी भारतीय क्रिकेटप्रेमी सुधीर गौतम याला कडकडून मिठी मारली. तसेच त्यांनी ये दोस्ती हम नही छोडेंगे हे गाणेही म्हटले.

Vertical Image: 
English Headline: 
2019 Cricket World Cup The Pak-born fan Mohammad Bashir says India wins against Pakistan
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
भारत, वर्ल्ड कप 2019, पाकिस्तान, मँचेस्टर, विश्‍वकरंडक, क्रिकेट, cricket
Twitter Publish: 
Meta Description: 
भारत आणि पाकिस्तान यांच्यात होत असलेल्या हायव्होल्टेज सामन्यात भारतच एकतर्फी विजय मिळवेल असा अंदाज कराचीत जन्मलेले आणि न्यूयॉर्कमध्ये व्यवसायासाठी स्थायिक झालेले महंमद बशीर यांनी व्यक्त केला आहे. बशीर चाचा अशीही त्यांची ओळख आहे. 

from News Story Feeds http://bit.ly/2WMmLJ4

No comments:

Post a Comment