Cue3

Saturday, June 29, 2019

ऑस्ट्रेलियाचा न्यूझीलंडवर 86 धावांनी विजय; स्टार्कचे 5 बळी

लंडन : ऑस्ट्रेलियाच्या तुफान माऱ्यासमोर यंदाच्या विश्वकरंडकात आणखी एक संघाची पडझड पाहायला मिळाली. मिशेल स्टार्क आणि जेसन बेंडहॉर्फ यांच्या वेगवान गोलंदाजीसमोर न्यूझीलंडचा डाव अवघ्या 157 धावांत संपुष्टात आला आणि ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडवर 86 धावांवर सहज विजय मिळविला. या पराभवामुळे न्यूझीलंडला आता उपांत्य फेरीच्या तिकीटासाठी पुढील सामन्यात विजय आवश्यक आहे.

विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत शनिवारी न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टने अखेरच्या षटकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध सनसनाटी हॅट्‌ट्रीक केली. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 243 धावा करत किवींसमोर 244 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानासमोर न्यूझीलंडचा संघ फक्त 157 धावांच करू शकला. स्टार्कने पाच आणि बेंडहॉर्फने दोन बळी मिळविले. 

प्रकाशझोतातील सामन्यात कांगारूंनी नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली. त्यांनी निम्मा संघ 92 धावांत गमावला होता. यापूर्वीच्या सामन्यांत अपेक्षित सातत्य राखू न शकलेल्या ख्वाजाने किल्ला लढविला. त्याला यष्टिरक्षक-फलंदाज ऍलेक्‍स केरीने मोलाची साथ दिली. या जोडीने 107 धावांची भर घातली. केन विल्यमसन याने पुन्हा एकदा ही जोडी फोडली. त्याने केरीला बाद केले. तळातून कमिन्सने प्रतिकार केला. 

न्यूझीलंडकडून कर्णधार केन विल्यम्सन (40 धावा) आणि रॉस टेलर (30 धावा) वगळता कोणीच खेळपट्टीवर टिकू शकले नाही. कठीण समयी अर्धशतक झळकाविणारा ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक ऍलेक्स कॅरी याला सामन्याचा मानकरी म्हणून घोषीत करण्यात आले.

संक्षिप्त धावफलक : 
ऑस्ट्रेलिया : 50 षटकांत 9 बाद 243 (डेव्हिड वॉर्नर 16, ऍरॉन फिंच 8, उस्मान ख्वाजा 88-129 चेंडू, 5 चौकार, स्टीव स्मिथ 5, मार्कस स्टॉयनीस 21, ग्लेन मॅक्‍सवेल 1, ऍलेक्‍स केरी 71-72 चेंडू, 11 चौकार, पॅट कमिन्स नाबाद 23, ट्रेंट बोल्ट 10-1-51-4, लॉकी फर्ग्युसन 10-0-49-2, जिमी निशॅम 6-0-28-2, केन विल्यमसन 7-0-25-1) विजयी वि. न्यूझीलंड : 43.4 षटकांत सर्वबाद 157 (केन विल्यमसन 40, रॉस टेलर 30, मिशेल स्टार्क 5-26, बेंडहॉर्फ 2-31)

बोल्टचा पराक्रम 
- अखेरच्या षटकात हॅट्‌ट्रीक नोंद 
- तिसऱ्या चेंडूवर बोल्टने उस्मान ख्वाजाचा (88) त्रिफळा 
- चौथ्या चेंडूवर प्रतिस्पर्धी डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कची शून्यावर दांडी 
- पाचव्या चेंडूवर जेसन बेहरनडॉर्फ पायचीत असल्याचा मैदानावरील पंचांचा कौल 
- कांगारूंचा डीआरएसचा निर्णय घेतला. त्यात किवींच्या बाजूने निर्णय 
- विश्वकरंडकात हॅट्ट्रिक केलेला बोल्ट न्यूझीलंडचा पहिलाच गोलंदाज ठरला. 
- बोल्टची यापूर्वी गेल्या वर्षी 7 नोव्हेंबर रोजी अबुधाबीत पाकिस्तानविरुद्ध हॅट्‌ट्रीक 

News Item ID: 
599-news_story-1561861217
Mobile Device Headline: 
ऑस्ट्रेलियाचा न्यूझीलंडवर 86 धावांनी विजय; स्टार्कचे 5 बळी
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

Vertical Image: 
English Headline: 
World Cup 2019 Australia beat New Zealand by 86 runs at Lords
Author Type: 
External Author
वृत्तसंस्था
Search Functional Tags: 
क्रिकेट, cricket, न्यूझीलंड, ट्रेंट बोल्ट, ऑस्ट्रेलिया, मिशेल स्टार्क, केन विल्यम्सन
Twitter Publish: 
Meta Description: 
ऑस्ट्रेलियाच्या तुफान माऱ्यासमोर यंदाच्या विश्वकरंडकात आणखी एक संघाची पडझड पाहायला मिळाली. मिशेल स्टार्क आणि जेसन बेंडहॉर्फ यांच्या वेगवान गोलंदाजीसमोर न्यूझीलंडचा डाव अवघ्या 157 धावांत संपुष्टात आला आणि ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडवर 86 धावांवर सहज विजय मिळविला.

from News Story Feeds https://ift.tt/2Je06AS

No comments:

Post a Comment