Cue3

Friday, May 31, 2019

ऑलिम्पिकपासून रोखण्यासाठी हे षडयंत्र - रोइंगपटू दत्तू भोकनळ

नाशिक: पुढील वर्षी (सन 2020) होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेपासून रोखत माझे रोईंग या खेळातील करिअर संपविण्यासाठी माझ्याविरोधात कथित पत्नीकडून खोटे आरोप केले जात आहे. मला या सर्व प्रक्रीयेत व्यस्तठेवत सरावापासून माझे लक्ष विचलित करण्यासाठी हे षडयंत्र रचण्यात आले असे आंतरराष्ट्रीय रोइंगपटू दत्तू भोकनळ यांने आज सांगितले. मला ब्लॅकमेल करत मोठ्या पैशाची मागणीही केली जात असल्याचे तो म्हणाला. 

आडगाव पोलिस ठाण्यात दत्तू भोकनळ यांच्या विरूद्ध कौंटुबिक छळ आणि फसवणूक केल्याप्रकरणी कथित पत्नीकडून फिर्याद दाखल करण्यात आली. याप्रकरणी बुधवारी न्यायालयात हजर झालेल्या दत्तूला जामीन मंजूर करण्यात आला. त्यानंतर दत्तूने पत्रकार परिषदेत आपली बाजू मांडली. तो म्हणाला, मी विवाह झाल्याचे नाकारलेले नाही,केवळ मला ब्लॅकमेल करत मानसिक त्रास देऊन नियमित सराव व ऑलिम्पिक पदकापासून दूर ठेवणे यासाठी हा सारा खटाटोप आहे.

या कृतीमागे अनेकांचा हात आहे. या प्रकरणात माझ्याकडे मोठी आर्थिक मागणीही करण्यात आली. केवळ ती मागणी मान्य न केल्याने माझ्यावर खोटे आरोप लावून माझे लक्ष विचलित करण्यात येत आहे. मी माझी बाजू न्यायालयात मांडल्यानंतर काय खरे आणि काय खोट हे सर्व स्पष्ट होईल. न्याय व्यवस्थेवर माझा पूर्ण विश्‍वास आहे. जामीनासाठी ठेवण्यात आलेल्या सर्व अटी व शर्तींचे मी नक्कीच पालन करेल.. या प्रकरणाचा अंतिम निकाल लागल्यानंतर मी सर्वांपुढे माझ्या विरोधात षडयंत्र करण्यांची नावे जाहीर करेल. सध्या देशासाठी पदक मिळविणे हेच आता माझे उद्दिष्ट असून त्यासाठी मी संपूर्ण तयारी करत आहे. यात मी कुठेही कमी पडणार नाही,असेही त्याने आवर्जुन सांगितले. 

News Item ID: 
558-news_story-1559234731
Mobile Device Headline: 
ऑलिम्पिकपासून रोखण्यासाठी हे षडयंत्र - रोइंगपटू दत्तू भोकनळ
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

नाशिक: पुढील वर्षी (सन 2020) होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेपासून रोखत माझे रोईंग या खेळातील करिअर संपविण्यासाठी माझ्याविरोधात कथित पत्नीकडून खोटे आरोप केले जात आहे. मला या सर्व प्रक्रीयेत व्यस्तठेवत सरावापासून माझे लक्ष विचलित करण्यासाठी हे षडयंत्र रचण्यात आले असे आंतरराष्ट्रीय रोइंगपटू दत्तू भोकनळ यांने आज सांगितले. मला ब्लॅकमेल करत मोठ्या पैशाची मागणीही केली जात असल्याचे तो म्हणाला. 

आडगाव पोलिस ठाण्यात दत्तू भोकनळ यांच्या विरूद्ध कौंटुबिक छळ आणि फसवणूक केल्याप्रकरणी कथित पत्नीकडून फिर्याद दाखल करण्यात आली. याप्रकरणी बुधवारी न्यायालयात हजर झालेल्या दत्तूला जामीन मंजूर करण्यात आला. त्यानंतर दत्तूने पत्रकार परिषदेत आपली बाजू मांडली. तो म्हणाला, मी विवाह झाल्याचे नाकारलेले नाही,केवळ मला ब्लॅकमेल करत मानसिक त्रास देऊन नियमित सराव व ऑलिम्पिक पदकापासून दूर ठेवणे यासाठी हा सारा खटाटोप आहे.

या कृतीमागे अनेकांचा हात आहे. या प्रकरणात माझ्याकडे मोठी आर्थिक मागणीही करण्यात आली. केवळ ती मागणी मान्य न केल्याने माझ्यावर खोटे आरोप लावून माझे लक्ष विचलित करण्यात येत आहे. मी माझी बाजू न्यायालयात मांडल्यानंतर काय खरे आणि काय खोट हे सर्व स्पष्ट होईल. न्याय व्यवस्थेवर माझा पूर्ण विश्‍वास आहे. जामीनासाठी ठेवण्यात आलेल्या सर्व अटी व शर्तींचे मी नक्कीच पालन करेल.. या प्रकरणाचा अंतिम निकाल लागल्यानंतर मी सर्वांपुढे माझ्या विरोधात षडयंत्र करण्यांची नावे जाहीर करेल. सध्या देशासाठी पदक मिळविणे हेच आता माझे उद्दिष्ट असून त्यासाठी मी संपूर्ण तयारी करत आहे. यात मी कुठेही कमी पडणार नाही,असेही त्याने आवर्जुन सांगितले. 

Vertical Image: 
English Headline: 
marathi news dattu bhoknal
सकाळ वृत्तसेवा
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
नाशिक, Nashik, खत, रोईंग, करिअर, पोलिस, पत्रकार, नासा
Twitter Publish: 

from News Story Feeds http://bit.ly/2Qzbk69

No comments:

Post a Comment