गणूर- चांदवड तालुक्याचे नाव जगाच्या पटलावर उमटविणारा रोईगपटू, सुवर्णपदक विजेता दत्तू भोकनळ चांगल्याच अडचणीत आला त्याच्यावर महिला पोलीस कर्मचार्याने आडगाव पोलीस स्थानकात फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. या घटनेमुळे देशाच्या क्रीडा तसेच पोलीस प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत दत्तू भोकनळ व त्यांच्या वकिलांशी आम्ही संपर्क साधला असता, “प्रकरण न्यायालयीन असल्याने तूर्त कुठलीही प्रतिक्रिया देण संयुक्तिक नाही” असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान तक्रारदार महिला आशा दत्तू भोकनळ हि नाशिक पोलीस नियंत्रण कक्षात कार्यान्वित असून आम्ही धार्मिक पध्ततीने विवाह केला असून मी दत्तू भोकनळ यांची कायदेशीर पत्नी असल्याचा दावा देखील तिने केला आहे. दत्तू व आशा यांच्यात दत्तू च्या एका सत्कार समारंभात ओळख झाली होती त्याचे रुपांतर नंतर प्रेमात झाले व दोघांनी पुणे जिल्ह्यातील देवाची आळंदी येथे वैदिक पद्धतिने विवाह केल्याचे तिने म्हंटले आहे. यानंतर दत्तू ने वचन दिल्याप्रमाणे आम्ही सर्वासमक्ष दिनांक ९ फेब्रुवारी २०१९ निमगव्हाण ता. चांदवड येथील समर्थ लोन्स येथे लग्न करणार होतो, त्यासाठी आशा यांच्या भावाने १ लाख रुपये देखील लोन्स साठी अडव्हांस दिला असल्याचे आशा यांनी फिर्यादीत म्हंटले आहे. परंतु एन लग्नाच्या दिवशी, “माझी तब्बेत ठीक नाही मी लग्नाला येऊ शकत नाही व तू मला फोन केले तर मी विष पिऊन आत्महत्या करून घेईल” अशा प्रकारचे उत्तर दत्तू ने दिल्याचे आशा यांनी म्हंटले आहे.
यानंतर मात्र दत्तू यानेच १३ फेब्रुवारी रोजी नाशिक येथे येऊन वादावादी केली व २४ फेब्रुवारी २०१९ हि लग्नाची पुन्हा तारीख ठरवली मात्र ह्यावेळी देखील दत्तूने मी कोणत्याही परिस्थतीत तुझ्याशी लग्न करणार नाही माझा नाद सोडून दे असे सांगितले. यावर आशा यांनी पुन्हा दत्तू ला समक्ष भेटून समजावून सांगितले यावर दत्तू ने “मी तुझ्याशी एकदा लग्न केले आहे पुन्हा करणार नाही आणि तुला माझ्या घरी पण नेणार नाही असे सांगितल्याने अखेर आशा भोकनळ यांनी आडगाव नाशिक पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे.
यात २२ डिसेंबर २०१७ पासून तर दिनांक ३ मार्च २०१९ दरम्यान माझे पती दत्तू भोकनळ वय २८ राहणार तळेगाव रोही ता. चांदवड जिल्हा नाशिक सध्या राहणार आर्मी रोइंग नोड नाशिक फाटा यांनी माझ्याशी लग्न करून झालेले लग्न नातेवाईकाना न कळवता मला मानसिक व शारीरिक त्रास देऊन पुन्हा गावी सर्वासमक्ष लग्न करण्याचे विश्वासाने ठरवून, खरेदी करून, लोन्स बुक करून लग्नाची ९ फेब्रुवारी व २४ फेब्रुवारी २०१९ या तारखा ठरवून देखील दोन्ही तारखेस न येता आमची फसवणूक केली आहे म्हणून त्यांचे विरुद्ध फिर्याद देत असल्याचे आशा भोकनळ यांनी म्हंटले आहे.

from News Story Feeds http://bit.ly/2HoY8Ol
No comments:
Post a Comment