कोलंबो : श्रीलंकेच्या क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सनथ जयसूर्या यांचे अपघाती निधन झाल्याच्या अफवा आज (सोमवार) दुपारी सोशल मीडियावर सुरू झाल्या. मात्र, यात कोणतेही तथ्य नसल्याचा खुलासा करण्यात आला. भारताचा फिरकी गोलंदाज आर. आश्विन, अभिनेता अर्शद वारसी यांनी जयसूर्या यांच्या निधनाबद्दल ट्विट केले होते.
Is the news on Sanath Jayasuriya true?? I got a news update on what's app but see nothing here on Twitter!!
— Ashwin Ravichandran (@ashwinravi99) May 27, 2019
This news is so shocking & sad...https://t.co/NvinJ227k2
— Arshad Warsi (@ArshadWarsi) May 27, 2019
एका संकेतस्थळावर जयसूर्या यांच्या निधनाचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. 'कॅनडामध्ये जयसूर्या यांना एका कारने धडक दिली. गंभीर जखमी अवस्थेत जयसूर्या यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान त्यांचे निधन झाले', असे त्या बातमीमध्ये म्हटले होते. विशेष म्हणजे, जयसूर्या यांच्या निधनाच्या वृत्तास कॅनडातील श्रीलंकेच्या दुतावासानेही दुजोरा दिल्याचे त्या बातमीत म्हटले होते. मात्र, खुद्द जयसूर्या यांनी या आरोपांचे खंडन केले.
It was a fake news https://t.co/IcdYhWz0vH
— Harsh (@Harsh1904MJ) May 27, 2019
'मी गेल्या काही महिन्यांत कधीही कॅनडाला गेलो नाही. मी सध्या श्रीलंकेमध्येच आहे आणि पूर्णपणे तंदुरुस्त आहे', असे जयसूर्या यांनी म्हटले आहे.
Please disregard fake news by malicious websites regarding my health and well being.
I am in Srilanka and have not visited Canada recently.Please avoid sharing fake news.— Sanath Jayasuriya (@Sanath07) May 21, 2019

from News Story Feeds http://bit.ly/2Qsswdw
No comments:
Post a Comment