वर्ल्ड कप 2019 : मुंबई : जून महिन्यात होणाऱ्या विश्वकरंडकासाठी भारतीय संघात चौथ्या क्रमांकावर कोणता फलंदाज खेळणार, चौथा वेगवान गोलंदाज कोण, धोनीला बदली यष्टीरक्षक म्हणून कोणत्या खेळाडूला संघात स्थान मिळणार? या साऱ्या प्रश्नांची उत्तरे अखेर आज (सोमवार) मिळाली. आज दुपारी तीनच्या सुमारास विश्वकरंडकासाठी 15 खेळाडूंचा भारतीय संघ जाहीर करण्यात आला. रवींद्र जडेजा, विजय शंकर आणि दिनेश कार्तिक यांना संघात स्थान देण्यात आले.
भारतीय संघात चौथ्या क्रमांकासाठी कोणता फलंदाज खेळणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. अखेर चौथ्या क्रमांकासाठी संघात केदार जाधव किंवा दिनेश कार्तिक यांची निवड करण्यात आली. धोनीला बॅकअप म्हणून दिनेश कार्तिकला स्थान देण्यात आले आहे.
अष्टपैलूंमध्ये गेल्या काही मालिकांमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या विजय शंकरला हार्दिक पंड्यासह स्थान देण्यात आले आहे. तसेच जसप्रित बुमरा, भुवनेश्वर कुमार आणि महंमद शमी यांना संघात स्थान देण्यात आले आहे.
भारतीय संघ : रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, विराट कोहली (कर्णधार), महेंद्रसिंह धोनी, केदार जाधव, विजय शंकर, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार, महंमद शमी, जसप्रित बुमरा, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल

from News Story Feeds http://bit.ly/2KDJ6I8
No comments:
Post a Comment