Cue3

Sunday, April 21, 2019

आशियाई अॅथलेटिक्स : पहिल्याच दिवशी हिमा दास जायबंदी

 नागपूर : दोहा येथील खलिफा स्टेडियमवर सुरु झालेल्या २३ व्या आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेत सकाळच्या सत्रात चारशे मीटरमधील ज्युनिअर विश्वविजेती हिमा दास जायबंदी झाल्याने भारताच्या अभियानाला धक्का बसला. हिमाच्या दुखापतीनंतर द्युतीचंदने प्राथमीक फेरीत शंभर मीटर शर्यतीत नोंदविलेला राष्ट्रीय विक्रम ही भारतीयांसाठी जमेची बाजू ठरली. ती एक-दोन दिवसांत तंदुरुस्त होईल, असे डॉक्टर सांगत असले तरी ती महिलांच्या ४-४०० आणि मिश्र रिलेत धावणार का याविषयी भारतीय संघाचे प्रशिक्षक राधाकृष्णकृष्णन नायर यांनी निश्चित माहिती दिली नाही.

सकाळी चारशे मीटर शर्यतीला सुरुवात झाल्यानंतर हिमाच्या पायाचा स्नायू खेचल्या गेला. यामुळे ती शर्यत पूर्ण करू शकली नाही. ही दुखापत गंभीर नसून चिंता करण्यासारखी काही नाही, असे डॉक्टरांनी सांगतल्याची माहिती नायर यांनी दिली. त्यामुळे चारशे मीटरमध्ये भारताच्या आशा अनुभवी एम.आर. पुवम्मावर आहेत. तिने प्राथमीक फेरीत दुसरे स्थान (५२.४६ सेकंद) मिळविताना अंतिम फेरीत स्थान मिळविले. महिलांच्या शंभर मीटर शर्यतीत राष्ट्रीय विक्रमवारी द्युतीचंदने आपल्याच विक्रमात सुधारणा केली.

तिने ११.२८ सेकंदाचा नवीन विक्रम नोंदविताना गेल्यावर्षी गुवाहाटी येथे नोंदविलेला ११.२९ सेकंदाचा विक्रम मोडित काढला. या कामगिरीमुळे ती अंतिम फेरीसाठी पात्र ठरली. पुरुषांच्या चारशे मीटर शर्यतीत पदकाचे दावेदार असलेले आरोक्य राजीव व महम्मद अनस यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. राजीवने प्राथमीक फेरीत प्रथम स्थान मिळविताना ४६.२५ सेकंदात शर्यत पूर्ण केंली. अनसनेही आपल्या शर्यतीत अव्वल स्थान मिळविले.

जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक जिंकणाऱ्या जिन्सॉन जॉन्सनने आठशे मीटर शर्यतीत उपांत्य फेरी गाठताना प्राथमीक फेरीत कतारच्या जमाल हैराने पाठोपाठ दुसरे स्थान मिळविले. मंजीत सिंगच्या माघारीमुळे संघात आलेल्या महम्मद अफजलने प्राथमीक फेरीत अव्वल स्थान मिळवून उपांत्य फेरी गाठली. पुरुषांच्या तिहेरी उडीत प्रवीण चित्रावेल आणि महिलांच्या आठशे मीटर शर्यतीत एम. गोमतीने अंतिम फेरीत स्थान मिळविले

News Item ID: 
558-news_story-1555867572
Mobile Device Headline: 
आशियाई अॅथलेटिक्स : पहिल्याच दिवशी हिमा दास जायबंदी
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

Vertical Image: 
English Headline: 
Hima das gets injured on day one of Asian Athletics Championship
सकाळ वृत्तसेवा
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
भारत, नागपूर
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Asian Athletics Championship, Hima Das
Meta Description: 
हिमाच्या दुखापतीनंतर द्युतीचंदने प्राथमीक फेरीत शंभर मीटर शर्यतीत नोंदविलेला राष्ट्रीय विक्रम ही भारतीयांसाठी जमेची बाजू ठरली

from News Story Feeds http://bit.ly/2IweK8v

No comments:

Post a Comment