Cue3

Monday, February 25, 2019

अखेरच्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाचा भारतावर विजय

विशाखापट्टणम : हातातून गेलेला विजय गोलंदाज खेचून आणणार असे वाटत असताना उमेश यादवला अखेरच्या षटकांत अचूकता राखण्यात आलेल्या अपयशाने भारताला रविवारी पहिल्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून तीन गडी राखून पराभव पत्करावा लागला. भारताला 7 बाद 126 असे रोखल्यावर ऑस्ट्रेलियाने अखेरच्या चेंडूवर विजयाला गवसणी घालताना 7 बाद 127 धावा केल्या.

प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यावर भारताला लोकेश राहुलचे अर्धशतक आणि कर्णधार विराट कोहली यांच्यातील भागीदारीमुळेच सव्वाशेची मजल मारता आली. पॉवर प्लेनंतर भारतीय फलंदाज धावांचा वेग वाढवू शकले नाहीत. त्यामुळे त्यांचा डाव 7 बाद 126 असा मर्यादित राहिला होता.

आव्हानाचा पाठलाग करताना सुरवातीलाच ऑस्ट्रेलियाला दोन धक्के देऊन भारताने चांगली सुरवात केली. मात्र, नंतर ग्लेन मॅक्‍सवेल (56) आणि डीआर्सी शॉर्ट (37) यांच्या फलंदाजीने ऑस्ट्रेलियाने आव्हान राखले. मात्र, आवश्‍यक धावगतीचे समीकरण साधण्याच्या नादात मॅक्‍सेवल आक्रमक फटका खेळताना बाद झाला आणि शॉर्ट दुसरी धाव घेण्याच्या नादात बाद झाला. पदार्पण करणारा मार्कंडे आणि बुमरा यांनी ऑस्ट्रेलियाला रोखून धरले. विजयासाठी अखेरच्या षटकांत 14 धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियासमोर होते. ऑस्ट्रेलियापेक्षा भारतीय गोलंदाज उमेश यादवलाच हे आव्हान पेलता आले नाही. पॅट कमिन्स आणि जिये रिचर्डसन यांनी दोन चौकारांसह सहा धावा पळून काढत ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

News Item ID: 
558-news_story-1551027800
Mobile Device Headline: 
अखेरच्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाचा भारतावर विजय
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

विशाखापट्टणम : हातातून गेलेला विजय गोलंदाज खेचून आणणार असे वाटत असताना उमेश यादवला अखेरच्या षटकांत अचूकता राखण्यात आलेल्या अपयशाने भारताला रविवारी पहिल्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून तीन गडी राखून पराभव पत्करावा लागला. भारताला 7 बाद 126 असे रोखल्यावर ऑस्ट्रेलियाने अखेरच्या चेंडूवर विजयाला गवसणी घालताना 7 बाद 127 धावा केल्या.

प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यावर भारताला लोकेश राहुलचे अर्धशतक आणि कर्णधार विराट कोहली यांच्यातील भागीदारीमुळेच सव्वाशेची मजल मारता आली. पॉवर प्लेनंतर भारतीय फलंदाज धावांचा वेग वाढवू शकले नाहीत. त्यामुळे त्यांचा डाव 7 बाद 126 असा मर्यादित राहिला होता.

आव्हानाचा पाठलाग करताना सुरवातीलाच ऑस्ट्रेलियाला दोन धक्के देऊन भारताने चांगली सुरवात केली. मात्र, नंतर ग्लेन मॅक्‍सवेल (56) आणि डीआर्सी शॉर्ट (37) यांच्या फलंदाजीने ऑस्ट्रेलियाने आव्हान राखले. मात्र, आवश्‍यक धावगतीचे समीकरण साधण्याच्या नादात मॅक्‍सेवल आक्रमक फटका खेळताना बाद झाला आणि शॉर्ट दुसरी धाव घेण्याच्या नादात बाद झाला. पदार्पण करणारा मार्कंडे आणि बुमरा यांनी ऑस्ट्रेलियाला रोखून धरले. विजयासाठी अखेरच्या षटकांत 14 धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियासमोर होते. ऑस्ट्रेलियापेक्षा भारतीय गोलंदाज उमेश यादवलाच हे आव्हान पेलता आले नाही. पॅट कमिन्स आणि जिये रिचर्डसन यांनी दोन चौकारांसह सहा धावा पळून काढत ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

Vertical Image: 
English Headline: 
Australia beat India by 3 wickets in first T20
वृत्तसंस्था
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
भारत, विराट कोहली, Virat Kohli, विशाखापट्टणम, ऑस्ट्रेलिया, ग्लेन मॅक्‍सवेल
Twitter Publish: 

from News Story Feeds https://ift.tt/2H4ONeV

No comments:

Post a Comment