वेलिंग्टन : गेल्या काही दिवसात भारतीय क्रिकेटने सर्व प्रकारांमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये भारतीय संघाला राखीव खेळाडूंची ताकद तपासता आली आहे. तसेच विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्माचे उत्तम नेतृत्वगुण अनुभवयास मिळाले आहेत. भारताचा हाच उपकर्णधार आता कोहलीचा विक्रम मोडण्याच्या मार्गावर आहे. ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये भारतासाठी कोहलीपेक्षा जास्त विजय मिळविण्याची संधी रोहितला उपलब्ध झाली आहे.
रोहितने 11 ट्वेंटी20 सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे. त्यापैकी 11 सामन्यांमध्ये भारताने विजय मिळविला आहे. गेल्या वर्षी झालेल्या निधहास करंडकात भारताला श्रीलंकेविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. रोहित शर्माचा नेतृत्वाखाली झालेला भारताचा हा एकमेव पराभव आहे.
कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 20 सामने खेळले आहेत. त्यापैकू 12सामन्यात भारताचा विजय झाला आहे. सात सामन्यात पराभव झाला आहे तर एक सामना बरोबरीत सुटला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेंटी20 मालिकेत विजय मिळविल्यास रोहितला कोहलीचा सर्वाधिक विजय मिळविण्याचा विक्रम मोडता येईल.
या यादीत भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धओनी प्रथम क्रमांकावर आहे. त्याने भारताचे 72 ट्वेंटी20 सामन्यांत नेतृत्व केले होते. त्यातील 44 सामन्यांत भारताने विजय मिळविला आहे. रोहित शर्माची जिंकण्याची टक्केवारी 99.66 आहे तर कोहलीची जिंकण्याची टक्केवारी 63.15 आहे. जिंकण्याच्या टक्केवारीनुसार रोहित कोहलीपेक्षा फार पुढे आहे.

from News Story Feeds http://bit.ly/2Bo9MFH
No comments:
Post a Comment