हॅमिल्टन- न्यूझीलंडमध्ये ट्वेंटी-20 मालिका जिंकण्याचे भारतीय संघाचे स्वप्न अपूर्ण राहिले. दिनेश कार्तिक व कृणाल पांड्या यांनी अखेरच्या काही षटकांत तुफान फटकेबाजी करताना भारताला विजयाच्या उंबरठ्यावर आणले होते, परंतु न्यूझीलंड संघाने चांगली कामगिरी करताना विजय मिळवला. न्यूझीलंडने तिसरा सामना 4 धावांनी जिंकून मालिका 2-1 अशी खिशात घातली.
213 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरवात खराब झाली. सलामीवीर शिखर धवन केवळ 05 धावा करून बाद झाला. पहिल्याच षटकात मिचेल सँटनरने त्याला बाद केले. मात्र, कर्णधार रोहित शर्मा व विजय शंकर यांनी संघावर दडपण येऊ न देता दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 75 धावांची भागीदारी केली. विजय 28 चेंडूंत 5 चौकार व 2 षटकार खेचून 43 धावांवर माघारी परतला. त्यानंतर आलेल्या रिषभ पंतने जोरदार फटकेबाजी करताना धावा आणि चेंडू यांचे अंतर कमी केले. पंतने 12 चेंडूंत 3 षटकार व 1 चौकार खेचताना 28 धावा केल्या. 13 व्या षटकात पंतला ब्लेर टिकनरने बाद केले. त्यानंतर हार्दिक पांड्याने फटकेबाजी केली, परंतु दुसऱ्या बाजूने रोहित संयमी खेळी करत होता. पण, रोहित, हार्दिक आणि महेंद्रसिंग धोनी हे लागोपाठ माघारी परतल्यामुळे भारतीय संघाच्या अडचणी वाढल्या.
New Zealand take the series 2-1!
The Blackcaps hold off India despite a late charge from Krunal Pandya and Dinesh Karthik to win by four runs in Hamilton.#NZvIND scorecard https://t.co/Prav9ucvl2 pic.twitter.com/Udx6Y6MNIE
— ICC (@ICC) February 10, 2019
तत्पूर्वी, कॉलीन मुन्रो (72) आणि टीम सेइफर्ट (43) यांनी सलामीलाच केलेल्या फटकेबाजीच्या जोरावार न्यूझीलंडने भारतासमोर 213 धावांचे मोठे आव्हान ठेवले होते. या दोघांनी रचलेल्या भक्कम पायावर अन्य किवी फलंदाजांनी धावांचा डोंगर उभा केला. केन विलियम्सनने 27 धावा केल्या, तर कॉलीन ग्रँडहोमने अखेरच्या षटकांत फटकेबाजी करताना भारताची डोकेदुखी वाढवली. त्याने 16 चेंडूंत 30 धावा केल्या.

from News Story Feeds http://bit.ly/2E1KYVE
No comments:
Post a Comment