Cue3

Wednesday, February 13, 2019

जेमिमा, स्मृती मानधनाची भरारी

मुंबई - न्यूझीलंडविरुद्धच्या ट्‌वेन्टी-२० मालिकेत व्हाईटवॉश स्वीकारावा लागला असला तरी या मालिकेत ज्या दोघींनी भारताचा लढा कायम ठेवला त्या जेमिमा रॉड्रिग्ज आणि स्मृती मानधना यांना ट्‌वेन्टी-२० क्रमवारीत चांगला फायदा झाला. जेमिमा दुसऱ्या तर स्मृती सहाव्या स्थानी आली आहे.

तीन सामन्यांच्या या मालिकेत जेमिमाने १३२ धावा केल्या. त्यामुळे तिने चार क्रमांकांनी झेप घेतली, तर गेल्याच आठवड्यात एकदिवसीय क्रमवारीत पहिल्या स्थानी आलेल्या स्मृतीने चार क्रमांकांनी प्रगती केली. स्मृतीने या मालिकेत दोन अर्धशतकांसह सर्वाधिक १८० धावा केल्या. यामध्ये अखेरच्या सामन्यात तिने केलेली आक्रमक ८६ धावांची खेळी वाया गेली भारताने तो सामना अवघ्या दोन धावांनी गमावला.

जेमिमा आणि स्मृती यांचा अपवाद वगळता भारताच्या इतर फलंदाजांनी निराशा केली आणि त्याचा फटका त्यांना क्रमवारीत बसला.

हरमनप्रीत कौरची चार क्रमांकांनी घसरण झाली. त्यामुळे ती आता सातव्या स्थानी आली आहे. या मालिकेत केवळ अखेरचा सामना खेळण्याची संधी मिळालेल्या मिताली राजच्याही क्रमवारीत तीनने घसरण झाली.

गोलंदाजीत पूनम दुसरी
गोलंदाजीच्या क्रमवारीत पूनम यादवने दुसरे स्थान कायम राखले आहे, तर या मालिकेत चार विकेट मिळवणाऱ्या राधा यादवच्या क्रमवारीत १८ स्थानाची प्रगती झाली आहे. त्यामुळे ती १० व्या स्थानी आली आहे.

News Item ID: 
558-news_story-1550053299
Mobile Device Headline: 
जेमिमा, स्मृती मानधनाची भरारी
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

मुंबई - न्यूझीलंडविरुद्धच्या ट्‌वेन्टी-२० मालिकेत व्हाईटवॉश स्वीकारावा लागला असला तरी या मालिकेत ज्या दोघींनी भारताचा लढा कायम ठेवला त्या जेमिमा रॉड्रिग्ज आणि स्मृती मानधना यांना ट्‌वेन्टी-२० क्रमवारीत चांगला फायदा झाला. जेमिमा दुसऱ्या तर स्मृती सहाव्या स्थानी आली आहे.

तीन सामन्यांच्या या मालिकेत जेमिमाने १३२ धावा केल्या. त्यामुळे तिने चार क्रमांकांनी झेप घेतली, तर गेल्याच आठवड्यात एकदिवसीय क्रमवारीत पहिल्या स्थानी आलेल्या स्मृतीने चार क्रमांकांनी प्रगती केली. स्मृतीने या मालिकेत दोन अर्धशतकांसह सर्वाधिक १८० धावा केल्या. यामध्ये अखेरच्या सामन्यात तिने केलेली आक्रमक ८६ धावांची खेळी वाया गेली भारताने तो सामना अवघ्या दोन धावांनी गमावला.

जेमिमा आणि स्मृती यांचा अपवाद वगळता भारताच्या इतर फलंदाजांनी निराशा केली आणि त्याचा फटका त्यांना क्रमवारीत बसला.

हरमनप्रीत कौरची चार क्रमांकांनी घसरण झाली. त्यामुळे ती आता सातव्या स्थानी आली आहे. या मालिकेत केवळ अखेरचा सामना खेळण्याची संधी मिळालेल्या मिताली राजच्याही क्रमवारीत तीनने घसरण झाली.

गोलंदाजीत पूनम दुसरी
गोलंदाजीच्या क्रमवारीत पूनम यादवने दुसरे स्थान कायम राखले आहे, तर या मालिकेत चार विकेट मिळवणाऱ्या राधा यादवच्या क्रमवारीत १८ स्थानाची प्रगती झाली आहे. त्यामुळे ती १० व्या स्थानी आली आहे.

Vertical Image: 
English Headline: 
Jemima mandhana t-20 rankings
वृत्तसंस्था
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
भारत, एकदिवसीय, ODI, विकेट
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Jemima Rodriguez, Smriti Mandhana, T-20, cricket, sports
Meta Description: 
Jemima Rodriguez and Smriti Mandhana

from News Story Feeds http://bit.ly/2UQnN6q

No comments:

Post a Comment